कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या दणक्याने दोन नंबर धंदे वाल्यांची दानादान..
▪️ दारु तस्करांचे पायलटींग करणारे खात्यातील शिपाई रडारावर..
▪️ दारूची तस्करी करणारे दारू माफिया लपले बिळात..
▪️ मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला पोलिस अधिक्षकांना इशारा
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे
🎴 सावंतवाडी,दि.२४: गोव्याहून दारूची तस्करी करून शासनाचा महसूल बुडवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणारे दारू तस्करांची कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलच्या माध्यमातून पोलखोल झाल्यावर हे दारु तस्कर सध्या बिळात लपले असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
सावंतवाडी शहर हे दारू माफियांचे माहेर असली तरी कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड, वैभववाडी आदी भागातही दारू टोळी कार्यरत असल्याची माहिती त्या-त्या भागातून आम्हाला उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दारू माफियांचे हे रॅकेट मोठे असून त्यांचे धागेदोरे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई इथ पर्यंत पसरले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दारु माफियांना मदत करणारे हे प्रशासनातील चीटर-पिटर असून त्यांनाही मोठे घबाड मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दारू माफियांवर आज पर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून काही संशयित दलालांची मालमत्ता तपासावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
गेले अनेक वर्षे गोव्याहून सिंधुदुर्गात महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून दारू आणली जाते व ती चढ्या दराने सिंधुदुर्गात व सिंधुदुर्गाच्या बाहेर विकली जाते. एवढेच नव्हे तर दारू मिक्सिंग करणे, बाटल्यांची लेबले बदलणे, सिल पॅक करणे, आधी काम करणारी यंत्रणा या दारू तस्करांनी उभी केली असून एका अज्ञात ठिकाणी आलिशान घरात हे काम सुरू असल्याची माहिती उपलब्ध होत आहे.
याबाबत कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलने संपादकीय लेखातून मुद्देसूद आवाज उठविल्यानंतर कणकवली, कुडाळ, मालवण, देवगड, येथून सामाजिक कार्यकर्त्यांचे अनेक फोन आले त्यांनी आमच्या उठावाला पाठिंबा दर्शवून आपल्या भागातील अशा प्रकारची दारू तस्कर असल्याची माहिती दिली. त्यामुळे काही वर्षांपूर्वी ज्याची लायकी सायकल घेण्याची नव्हती, तो आता बीएमडब्ल्यू घेऊन फिरतोय! ते कोणते काम करून अशी चर्चा त्याभागात रंगू लागली आहे. सावंतवाडी दारू माफियांकडे अलिशान गाड्या, डंपर, कंटेनर, ट्रक, अलिशान गाड्या जागा अशा प्रकारची गडजंग संपत्ती आहे. ही संपत्ती त्यांनी दोन पिढ्या बसून खाल्ली तरी संपणार नाही. त्यामुळे या संपूर्ण संपत्तीची त्यांच्या नातेवाईकांची, त्यांच्या नावावर असलेल्या संपत्तीची खातेनिहाय सीआयडी मार्फत चौकशी झाल्यास सत्य माहिती उजेडात येणार आहे. अनेक लोकांचे संसार उध्वस्त करून आपले संसार उभे करणाऱ्या या दारू तस्करांवर कारवाई करायला शासनाचे अधिकृत खाते कमी पडत असेल किंवा किंवा हप्ते खाऊन त्या खात्यातील अधिकारी गब्बर झाले असतील व ते कमी पडत असतील तर अशा गुन्ह्यांचा तपास स्वतंत्र यंत्रणेकडे देऊन याची पाळेमुळे खोदून काढावी अशी मागणी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या वतीने मुख्यमंत्री, राज्यपाल, यांच्याकडे निवेदनाद्वारे केली जाणार आहे.
जिथे कुंपणच शेत खाते तिथे न्याय कुणाकडे मागणार?असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या खात्याने या दारू तस्करी करणार्यांना रोखायला पाहिजे ते खातेच या दारू तस्करांना गोंजारत असेल! पाठींबा देत असतील तर न्यायाची मागणी कोणाकडे करायची हा प्रश्न उभा राहतो. शासन त्यांच्या पगारावर करोडो रुपये खर्च करते, असे दारूबंदी उत्पादन शुल्क खाते नाम मात्र राहिले आहे. जिल्ह्यात आज पर्यंत केलेल्या मोठ्या कारवाया, पकडलेला मुद्देमाल, शासनाकडे जमा झालेला महसूल, अधिकाऱ्यांनी खुलेआम जाहीर करावा अशी आमची रास्त मागणी आहे.
नावाला एखाद दुसरी केस करायची व आपले खाते काम करत आहे, असे भासवायचे व कोट्यावधी रुपयाची सिंधुदुर्गात माया गोळा करून ते आपल्या मूळ गावी नेऊन जतन करून ठेवायची असाच प्रकार या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे या खात्याकडून काही कामच होत नसेल तर असे पांढरे हत्ती पोसायचेत हा आमचा प्रश्न आहे.
दारूबंदी उत्पादन शुल्क खाते बरखास्त करावे व तो सर्व कार्यभार पोलीस प्रशासनाकडे द्यावा अशी आमची रास्त मागणी आहे. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने या दारू तस्करांबद्दल उठाव केल्यावर अनेकांनी अशा गुप्त माहिती दिली की, या दारू तस्करांना मदत करणारे पोलिस खात्यातीलच काही माणसे आहेत, तीच माणसे यांचे पायलटिंग करतात. त्यामुळे दारु माफिया कोणाला जुमानत नाहीत. यांचे समुळ उच्चाटन करायचे असेल तर मुळाशी जायला पाहिजे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा दारूबंदी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी चोरटी दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात २०१५ ते २०२० पर्यंत या पाच वर्षात किती गुन्हे दाखल केलेत? त्यातील किती जणांना शिक्षा झाली? किती जण सुटलेत? किती जण त्याच प्रकरणात पुन्हा-पुन्हा आढळलेत?त्यांच्यावर नंतर कोणती कारवाई झाली? याबाबतची संपूर्ण माहिती गोळा करून या खात्याविरोधात उठाव केला जाणार आहे. सिंधुदुर्गातील सुजाण नागरिकांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलला मोबाईल द्वारे दिलेल्या माहितीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. चांगल्या कामासाठी चांगली माणसे नेहमी सहकार्य करत असतात. हे या निमित्ताने दिसून आले आहे. अल्पवयीन मुलांना दोन नंबर धंद्यामध्ये ओढून त्यांना पैशाच्या आमीश दाखवून त्यांना चरस, गांजा, दारू, अशा प्रकारच्या दोन नंबर धंद्यात अडकविणाऱ्या या दारु माफियांवर कारवाई व्हायला हवी असे आमचे ठाम मत आहे. तरच भावी पिढीचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचणार आहे.
या विरोधात मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेऊन एक महिन्याची मुदत दिली आहे. या एक महिन्याच्या कारकीर्दीत संपूर्ण धंदे बंद न झाल्यास मनसे बोंबाबोंब आंदोलन करून संबंधित पोलिस ठाण्यावर मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करून कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चा संपूर्ण पाठिंबा जाहीर करीत आहे.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*💥 प्रतिभा संपन्न कोकणच्या प्रत्येक हालचालींवर अतिसुक्ष्म नजर ठेवणारे कोकणातील सुपरफास्ट चॅनल….🔥*
🖥️ *कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज….💥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_