कोणी वंदा कोणी निंदा हप्ता खाणे हाच आमचा धंदा; राज्य उत्पादन शुल्क विभाग
▪️उद्धवा अजब तुझे सरकार; लबाड जोडती इमले माया; गुणवंतांना मात्र झोपड्या..
▪️पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा; वेश्येला मणिहार; उद्धवा अजब तुझे सरकार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे
🎴सावंतवाडी,दि.०७: महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अस्तित्वात आहे की, तो निद्रिस्त आहे की, हप्ते खाऊन सुस्तावलेला आहे, हेच समजेनासे झाले आहे. गोवा राज्यातून अवैध मद्याचा साठा सिंधुदुर्गात आणून तो महाराष्ट्र राज्याच्या इतर भागात पोचविण्याचे काम करणारे दारू तस्कर दिवसेंदिवस गब्बर होत असताना महाराष्ट्र शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविण्याचे काम गोवा राज्यातील दारू विक्रेते करत असताना राज्य उत्पादन शुल्क त्यावर कोणतीही कार्यवाही न करता खाऊन-खाऊन सुस्तावलेल्या अजगरासारखा निद्रिस्त होऊन पडला आहे.
याबाबत कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांना इशाराही दिला. या इशाऱ्यानंतर राज्याचे कोकण विभाग उपायुक्त वाय. एम. पवार यांच्या टीमला सिंधुदुर्गात पाठविण्यात आले. यांच्या टीमने सिंधुदुर्गात येऊन दिवे लावले व दिवाळी साजरी केली. शासनाला लाखो रुपये कर भरतात त्या परमिट धारकांवर धाडी टाकून त्यांना या ना त्या कारणात अडवून केसेस दाखल करण्यात आल्या. म्हणजे गोवा राज्यातून होत असलेल्या अवैध मद्य पुरवठा विरोधात ओरड करणाऱ्या चालकांना शांत करण्याचा प्रकार.
मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाशी या बार चालकांचे काहीतरी देणे लागते, म्हणून त्यांना तुम्ही शांत करू शकता. मात्र, आमचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही. हे तुम्हाला आम्ही याठिकाणी ठणकावून सांगत आहोत. नकाशा बरोबर नाही. नोकर नामा नाही. अशी वेगवेगळी कारणे दाखवून केस दाखल करून नंतर मांडवलीची भाषा केली जात असेल व नाक दाबून तोंड उघडण्याचा प्रयत्न करत असाल, तर आम्ही गप्प बसणार नाही. तुमचे कारणामे पुराव्यानिशी उघड करू हे या ठिकाणी जाहिर पणे सांगतो.
गोवा राज्यातून विशेष करून आरोंदा, तेरेखोल या भागातून मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गात दारूची वाहतूक होत आहे. या ठिकाणी तपासणी नाके कार्यरत असताना त्यांच्या वर कोणतीही कारवाई होत नाही. याचा अर्थ त्या ठिकाणच्या तपासणी नाक्यावरील पोलिसांना हप्ता मिळतो असाच होतो. आमचे पोलीस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना एकच सांगणे आहे, अशा तपासणी नाक्यावरून एखादी गाडी सुटली व त्या गाडीवर पुढच्या नाक्यावर कारवाई झाली, तर संबंधित नाक्यावरील पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्या पगारातून शासनाचा महसूल वसूल करण्यात यावा, म्हणजे पुढे अशी कोणी हिम्मत करणार नाही.
तुम्ही कितीही लिहा, काहीही करा आम्ही मात्र गोवा राज्यातून अवैध मद्य पुरवठा सिंधुदुर्गात करणारच असा अलिखित करारनामा या दारू तस्करांनी अधिकाऱ्यांशी केलेला असावा, असे आमचे मत आहे. कारण एवढे होऊन सुद्धा गोवा राज्यातून अद्याप पर्यंत सिंधुदुर्गात दारूचा पुरवठा केला जातो व महाराष्ट्र शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवला जातो व महाराष्ट्र शासनाने नेमलेले अधिकारी मुग गिळून गप्प आहेत. कायद्यामधील तरतुदीनुसार संबंधितांवर कारवाई झाली असती, तर गोवा राज्यातून येणारा अवैध मद्य साठा कधीच बंद झाला असता व गोरगरीब जनतेचे आशीर्वाद मिळाले असते. मात्र, शासनाच्या पगारावर संतुष्ट नसलेली ही राक्षसांची अवलाद असलेल्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीमुळे युवकांचे आयुष्य बरबाद होत आहे. तर अनेक माय, भगिनींची कुंकू पुसण्याचे काम या अधिकाऱ्यांनी केले आहे. ऐन तारुण्यात दारूच्या नशेमुळे युवा पिढी बरबाद होत आहे. कित्येक जणांचे बळी जात आहेत. ही विषारी दारू प्यालेला माणूस पुन्हा त्या दारूकडे आकर्षिला जातो व वर्षभरातच त्याचा बळी जातो. अशी कितीतरी उदाहरणे आमच्या समोर आहेत. हे सांगून सुद्धा अधिकारी जागे होत नाहीत, याचे दुःख वाटते.
एका ५० वर्षांच्या महिलेशी शय्यासोबत करणारे युवक हे सोळा-सतरा वर्षातील असावे यासारखे दुसरे दुर्दैव ते कोणते? हे युवक या दारू धंद्याशी संबंधित व दारूतून मिळालेला अमाप पैसा व पैशाची मस्ती त्यामुळेच हे विकृत धारिष्ट त्या युवकांनी केले व आपले जीवन उद्ध्वस्त करून घेतले. असा आमचा आरोप आहे. हे सर्व थांबविण्यासाठी गोव्यातून होणारा अवैध मद्याचा पुरवठा बंद करणे ही काळाची गरज आहे.
आज गल्लोगल्ली वस्त्या वस्त्यांवर दारू विक्रेते निर्माण झाले आहेत. गावागावात दारू विकणारे तयार झाले आहेत. ज्या ठिकाणी पार्टी करतात, त्या ठिकाणी दारू आणून देणार आहेत. ही सर्व दारू कुठून येते? तर ती गोवा राज्यातून. गोव्यामध्ये पंचवीस रुपयाला मिळणारे कॉटर याठिकाणी शंभर रुपयाला विकले जाते व तेच कॉटर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत परमिट बार मध्ये दोनशे रुपयेला मिळते. त्यामुळे महाराष्ट्राची दारू प्यायला कोणी जात नाही व स्वस्तात मिळणाऱ्या दारूच्या आहरी ही मंडळी जातात व आपले जीवन उद्ध्वस्त करून घेतात. दारू विकणारा करोडपती आणि पिणारे रोडपती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि परमिट धारकांना हातात कटोरा घेण्याची वेळ आली आहे.
गोव्यातून येणारा अवैध मद्य साठा काही परमिट बार मधून विकला जातो. अशा प्रकारच्या वावड्या उठल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पहिल्यांदा त्यांना टार्गेट केले. जिल्ह्यातील अनेक परमिट धारकांवर धाडसत्र सुरू केले. मात्र, त्यांच्याकडे काही मिळत नाही, असे दिसल्यावर वेगवेगळी कारणे दाखवून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला व त्याला प्रखरपणे बार संघटनेने विरोध केला. आपल्या वरील अन्याय सहन करणे हा पण एक गुन्हा आहे. अन्यायाविरुद्ध लढणे हे एक तत्व आहे. ते तत्त्व त्यांनी पाळले त्यामुळे आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. व गोवा राज्यातून होणारी अवैध दारू वाहतूक जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत आम्ही राज्य उत्पादन शुल्क, पोलीस प्रशासन यांच्या विरोधात सडेतोडपणे लिहीतच राहू हे या निमित्ताने सांगू इच्छितो. सत्तेत असणारे व सत्तेत नसणारे हे एकाच माळेचे मणी आहेत. ते या विरुद्ध आवाज उठविणार नाहीत. किंवा आपल्या शासनाचा महसूल बुडतो म्हणून कोणताही निर्णय घेणार नाहीत. कारण यांना यांचे लागेबांधे या लोकांशी आहेत. असा धंदा करणारे दारू तस्कर या राजकीय पक्षांची निगडीत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून अपेक्षा न करता स्वकर्तृत्वावर लढा उभारावा व याविरुद्ध लढावे हेच धोरण आम्ही अवलंबिले आहे.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*💥 प्रतिभा संपन्न कोकणच्या प्रत्येक हालचालींवर अतिसुक्ष्म नजर ठेवणारे कोकणातील सुपरफास्ट चॅनल….🔥*
🖥️ *कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज….💥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

