रत्नागिरीराजकीयशासकीयसामाजिक

आ. भास्करराव जाधव यांच्या पाठपुराव्याने खरवते-ओमळी-गुळवणे रस्ता सार्वजनिक बांधकामकडे वर्ग.

▪️ना. अशोकराव चव्हाण, ना. भरणे यांची भेट घेवून निवेदनाद्वारे केलेल्या मागणीला यश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.२८: आमदार भास्करराव जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे गुहागर मतदारसंघात येणाऱ्या चिपळूण तालुक्यातील खरवते-ओमळी-ताम्हनमळा-गुळवणे हा रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आहे. चालू वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या विधानसभेच्या अधिवेशन काळात आ. श्री. जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण आणि या खात्याचे राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदनाद्वारे या रस्त्यासह मतदारसंघातील अन्य रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी निवेदन देवून मागणी केली होती.

खरवते-ओमळी-ताम्हनमळा-गुळवणे हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारिमध्ये इतर जिल्हा मार्ग म्हणून होता. सुमारे १५ किलोमीटर अंतर असलेल्या या रस्त्याची दुरवस्था झाली असताना जिल्हा परिषदेकडून त्याची डागडुजी होणे अशक्य होते. आमदार भास्करराव जाधव हे गुहागर मतदारसंघाचे आमदार होण्यापूर्वी या भागातील अनेक मोठया लांबीचे रस्ते हे फारच खराब आणि अत्यंत अरूंद होते. ते आमदार झाल्यानंतर सगळयात पहिल्यांदा त्यांनी हे सर्व रस्ते जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आणि मोठया प्रमाणात या खात्याकडून निधी उपलब्ध करून घेतला.

परिणामी, गुहागर मतदारसंघातील बहुतांश रस्ते हे प्रशस्त आणि उत्कृष्ट दर्जाचे झालेले आज दिसून येतात.
मतदारसंघातील काही ठराविक शिल्लक राहिलेल्या रस्त्यांच्या दर्जोन्नतीकरणासाठी आ. श्री. जाधव यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यामध्ये खरवते-ओमळी-ताम्हनमळा-गुळवणे या रस्त्याचादेखील समावेश होता. फेब्रुवारीमध्ये झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेषनावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री. अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यावेळी या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देवू, असे आश्वासन त्यांनी दिले होते. परंतु, कोरोनामुळे अधिवेशन एक आठवडा अगोदर संपविण्यात आले आणि त्यानंतरच्या आठवडयात राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आला. त्यामुळे ही मंजुरी मिळू शकली नव्हती. लॉकडाऊन उठल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून आ. श्री. जाधव यांनी या कामाचा पुन्हा पाठपुरावा सुरू केला. ना. श्री. चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून दिलेल्या आष्वासनाची त्यांना आठवण करून दिली आणि अवघ्या काही दिवसांतच हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून घेण्यात ते यशस्वी ठरले. एवढेच नव्हे तर काल गुरूवारीच या दर्जोन्नतीच्या कामाचा शासन निर्णय काढून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी सर्वप्रथम तो आमदार श्री. जाधव यांच्याकडे पाठविला. हा रस्ता आता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून अस्तित्वात आला असून त्यामुळे आता या रस्त्याच्या कामाला निधी कमी पडणार नाही आणि मतदारसंघातील अन्य रस्त्याप्रमाणे तो प्रशस्त व चांगल्या दर्जाचा होणार आहे.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!