चिपळूण एस.टी. स्थानकाची पुनर्र निविदा सोमवारी प्रसिद्ध होणार..
▪️शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या पाठपुराव्याला यश..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.०७: येथील एस.टी. स्थानक बांधकामाचा ठेका रद्द झाल्यानंतर आता नवीन निविदा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून सोमवारी पुनर्र निविदा प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या पाठपुराव्याला एक प्रकारे मोठे यश आले आहे. स्पर्धा न करता एक चांगली वास्तू नागरिकांच्या सेवेत देण्यासाठी स्थानिक ठेकेदारांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन देखील तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी केले आहे.
चिपळूण मध्यवर्ती एस.टी. स्थानकाचे पुनर्रबांधणीसाठी शासनाने ४ कोटींचा निधी मंजूर केला होता. मुंबई येथील स्कायलार्क या कंपनीने हे काम घेतले होते. २०१७ मध्ये कामाची वर्कऑर्डर देण्यात आली. २०१९ मध्ये काम पूर्ण करायचे होते. परंतु फक्त पाया भरणीचे काम केल्यानंतर हे काम ठप्प पडले. त्यामुळे शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी काम सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे तगादा लावला. आंदोलनाचा इशारा दिला. आणि मुंबई ते चिपळूण पर्यंत संपूर्ण एस.टी. प्रशासन हडबडून गेले. आणि अखेर संबंधित ठेकेदार कंपनीचा ठेका रद्द करत त्याची अनामत रक्कम देखील जप्त केली. तसेच काही दिवसात या कामाचे नवीन निविदा काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी श्री. सावंत यांना दिले होते.
नवीन निविदा काढण्यासाठी श्री. संदीप सावंत यांनी सतत पाठपुरावा केला. खासदार विनायक राऊत, परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्या माध्यमातून त्यांनी हा विषय लावून धरला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सोमवारी या कामाची नवीन निविदा प्रसिद्ध होणार आहे. अशी माहिती श्री. संदीप सावंत यांनी दिली आहे.
निविदा प्रसिद्ध होताच स्थानिक ठेकेदारांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा. स्पर्धा हा हेतू न ठेवता गोरगरीब जनतेचे ते एक मंदिर आहे. या भावनेतून वास्तू उभी करावी. चिपळूण पोलीस ठाण्याची इमारत बघून जसे समाधान वाटते, तसे चिपळूण एस.टी. स्थानकाची वास्तू बघितल्यानंतर समाधान वाटेल अशा पद्धतीने ती वास्तू उभी करावी, असे आवाहन श्री. संदीप सावंत यांनी केले आहे.
*💥……… प्रवेश सुरु ……… 💥*
_🌈तंत्र शिक्षण क्षेत्रात करियर करण्याची संधी.._
*🔥डिप्लोमा इन इलेक्ट्रिशीयन🔥*
_💫कालावधी – १ वर्ष_
_💫शैक्षणिक पात्रता – किमान १० उत्तीर्ण_
*🤷🏻♂️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*इन्स्पायर एज्यूकेशन, सावंतवाडी (7466A)*
*_📱संपर्क : 9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_