आपत्कालीनवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

‘नावळे’त ‘बिबट्या’च्या हल्ल्यात शेळी ठार; मालकाचे आठ हजाराचे नुकसान

▪️दोन दिवसातील दुसरी घटना; गावात भीतीचे वातावरण

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.०७: बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी शिवाजी राजाराम गुरखे रा.नावळे धनगरवाडा यांच्या मालकीची शेळी ठार झाली आहे. शेतकरी गुरखे यांचे सुमारे ८ हजार चे नुकसान झाले आहे.

श्री. गुरखे हे शेळ्या घेऊन आपल्या मालकीच्या जंगलात शेळ्यांना चारण्यासाठी घेऊन गेले होते. दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका शेळीवर हल्ला केला. यात त्या शेळीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वैभववाडी तालुका वनविभागाचे वनपाल सदाशिव वाघरे, वनरक्षक प्रकाश पाटील घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. गेल्या दोन दिवसातील तालुक्यातील हि दुसरी घटना आहे.

या पूर्वी करूळ भट्टीवाडी येथील एका शेतकऱ्यांचा पाडा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता. सतत घडणाऱ्या घटनेमुळे सहयाद्री पट्ट्यातील गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.

*_🔥फ्री होम डिलिव्हरी ती ही फक्त सावंतवाडी शहरापुरती मर्यादित..🔥_*

*🍝 शिवन्या फास्टफूड 🍜*
कोविड-19 च्या काळात आमच्या सर्व ग्राहकांसाठी सावंतवाडीत आम्ही पुन्हा एकदा सुरू करीत आहोत. *फ्री होम डिलिव्हरी* सुविधा आणि ती ही पूर्णपणे सुरक्षित..

🍢गोबी मंचुरी        ₹25/-
🥘फ्लॉवर चिल्ली   ₹40/-
🥟स्टीम मोमो        ₹20/-

*_🤷🏻‍♂️खायला येणार कुठे? त्यासाठी आमचा पत्ता आहे,_*
हॉटेल मँगो 1 समोर, सावंतवाडी..

*_🙋🏼‍♂️मग वाट कसली पाहताय! उचला फोन आणि करा कॉल.._*
*_📱9404931801_*
*_📱9146144203_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!