पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात चिपळूण शिवसेनेची जोरदार निदर्शने..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.१२: पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करा.. नाहीतर खुर्च्या खाली करा.., या रावसाहेब दानवेचे करायचे काय..? खाली डोकं वरती पाय.., केंद्र सरकारचा निषेध असो.. मोदी सरकारचा धिक्कार असो..,आशा घोषणा देत शिवसैनिक थेट रस्त्यावर उतरले. शहरातील चिंचनाका येथे भर रस्त्यावर येऊन शिवसैनिकांनी केंद्रातील मोदी सरकार तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावाने अक्षरशः शिमगा करून निषेध नोंदवला.सुमारे अर्धातास हे आंदोलन सुरू होते.यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शेतकरी आंदोलन देशभर पेटलेले असतानाच रावसाहेब दानवे यांनी शेतकरी विरोधात केलेल्या वक्तव्यांनी संतापाची लाट उसळली आहे.तर दुसऱ्या बाजूला पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे.शेतकरी संतापला असतानाच पेट्रोल डिझेल दरवाडीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील नाराजी उसळली आहे.त्याची दखल घेत चिपळूण शिवसेनेने शनिवारी अचानक आंदोलनाची भूमिका घेतली.
तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे,संदीप सावंत,क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्या नेतृत्वाखाली शहरप्रमुख उमेश सकपाळ,तालुका समन्वयक राजू देवळेकर,नगरसेवक शशिकांत मोदी,मनोज शिंदे,युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते,शहरप्रमुख निहार कोळे,शिवसेना उपशहरप्रमुख यतीन कानडे,महिला शहर संघटक वैशाली शिंदे,रश्मीताई गोखले, यांच्यासह शिवसेना युवासेना आणि महिला आघाडी शनिवारी सकाळी ११ वाजता थेट रस्त्यावर उतरले.
शहरातील चिंचनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली.गगनभेदी घोषणा देत शिवसैनिक चिंचनाका चौकात आले आणि केंद्र सरकार तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावाने शिमगा करण्यास सुरुवात केली.यावेळी काही काळ येथील वाहतूक ठप्प झाली होती.सुमारे अर्धातास निदर्शने केल्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना बाजूला करण्यास सुरुवात करून रस्ता मोकळा करण्याची विनंती केली तेव्हा शिवसैनिक माघारी फिरले.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_