गुहागर बायपास रोड ठरतोय डोकेदुखी; शिवसेना आक्रमक

▪️अधिकाऱ्यांना जाब विचारणार; यतीन कानडे

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.०८: चिपळूण-गुहागर बायपास रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसाळ्यात आणि आताही तीच स्थिती आहे. वाहनांची प्रचंड गर्दी असणारा हा बायपास मार्ग आता अपघाताला कारणीभूत ठरणार आहे. मात्र, याद राखा! आता अर्ज विनंती करून ही दखल घेत नसाल, तर मग २६ जानेवारी रोजी जनआंदोलन उभारणार आणि शिवसेनेचा दणका देणार असल्याचा आक्रमक इशारा उपशहरप्रमुख यतीन कानडे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिला आहे.

चिपळूण-गुहागर मार्गावरील बायपास हा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे. या ठिकाणी हजारो शहरवासीयांचा जाण्या-येण्याचा मार्गाबरोबर गुहागरला जाण्यासाठी महत्वाचा बायपास असताना याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने मात्र दुर्लक्ष केले आहे. या संदर्भात शिवसेना उपशहरप्रमुख यतीन कानडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

उपशहरप्रमुख श्री. कानडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, मुळात पावसाळ्यात या ठिकाणी प्रचंड खड्डे आणि चिखल असल्याने अनेकांना म्हणजेच दुचाकी स्वरांना प्रचंड त्रास सोसावा लागला आहे. पावसाळ्यानंतर हा मार्ग दुरुस्त होईल असे वाटले होते. मात्र, आज पर्यंत संबंधित विभागाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप श्री. कानडे यांनी केला आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मी वारंवार निवेदन आणि स्वतः विनंती संबंधित खात्याला केली होती. मात्र, विनंती आणि निवेदनाची भाषा या खात्याला कळणार नाही. म्हणूनच २६ जानेवारी पर्यंत हा रस्ता दुरुस्त झाला नाही तर आपण तीव्र जनआंदोलन करेन आणि मग शिवसेना काय करू शकते हे संबंधित यंत्रणेला पहावयास मिळेल असा आक्रमक इशारा श्री. कानडे यांनी दिला आहे.

या ठिकाणी मोठे खड्डे आणि उडणारा धुरळा यामुळे मोठा  अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही सुस्तवलेल्या यंत्रणेला जर हे कळत नसेल तर मग आमच्या पद्धतीने त्यांना आम्ही कळवू विनंती साठी जोडलेले हात सुटण्याअगोदरच याची दखल घ्यावी अन्यथा मग जे काय असेल ते होउदे! असा इशारा श्री. यतीन कानडे यांनी दिला आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!