भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिर तर्फे रंगभरण व देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन
-
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिर तर्फे रंगभरण व देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन
राष्ट्रप्रेम व क्रांतिवीर यांच्यावरील ग्रंथ रुपी पुस्तकांचे प्रदर्शनात शारदा विद्यामंदीर शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग
सावंतवाडी (सुखदेव राऊळ)
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिर तर्फे रंगभरण व देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावेळी राष्ट्रप्रेम व क्रांतिवीर यांच्यावरील ग्रंथ रुपी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
ही रंगभरण व देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा शनिवार दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी शारदा विद्यालयामध्ये सकाळी 8.30 वाजता सुरू होणार आहे. रंगभरण स्पर्धेसाठी शारदा विद्यालयातील इयत्ता 1 ली ते 2 री चे विध्यार्थी -विद्यार्थीनी वर्ग तर इयत्ता 3 री व 4 थी च्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी वर्गाने देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत भाग घेतला आहे.
दरम्यान बुधवार दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी वाचनालयाच्या सभागृहात राष्ट्रप्रेम व क्रांतिवीरांवरील पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून,सर्व वाचक व ग्रंथप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कै.उदय खानोलकर वाचनालायतर्फे करण्यात आले आहे.