मळगांव पंचक्रोशीत स्क्रॅच कुपन बाबत रंगल्या चर्चा व गजाली

_*🛑मळगांव पंचक्रोशीत स्क्रॅच कुपन बाबत रंगल्या चर्चा व गजाली*

*🛑मळगांव पोलीस पाटील रोशनी जाधव यांच्या सतर्कतेचे कौतुक*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴 मळगाव, दि-० ६ फेब्रुवारी :-*
अमूक तमूक गावात, अमुक तमूक वाडीत, अमुक तमुक दिवशी या लोकांनी अमुक तमूक प्रकार केला. अमुक तमूक महिलेला असे फसवले तसे फसवले. ” अशा प्रकारच्या आणि विविध प्रकारच्या चर्चा गेले चार दिवस मळगांव सहीत आकेरी, नेमळे पंचक्रोशीत ऐकू येत आहेत. बाजार परीसर, गावातील नाका आदी ठिकाणी ग्रामस्थ घोळक्याने या चर्चा करत असल्याचे पहायला व ऐकायला मिळत आहे. याबाबत मळगांवच्या पोलीस पाटील रोशनी जाधव यांनी सोशल मिडीयावर वाॅटसअपच्या माध्यमातून मळगांवात घडलेल्या, ” स्क्रॅच कुपन ” विक्री करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गावातील घरोघरी फिरणाऱ्या “एक गाडी व गाडी मध्ये चार लुबाडी” प्रकारातल्या एका टोळक्याने आरंभलेल्या फसवणुकीच्या व्यवसायाबाबतची व त्यांना मोबाईल द्वारे संपर्क साधून जाब विचारल्यानंतर या टोळक्यातील महिलेने उलटसुलट उत्तर दिल्याची माहिती गुरुवारी प्रसारित केल्यानंतर मळगांव सहित पंचक्रोशीत एकप्रकारची खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी चर्चा व गजालींच्या माध्यमातून जणू जागृती मोहीम सुरु केल्याचे वास्तव आहे.
“नाही! मुळीच नाही! अशा अनोळखी फिरत्या विक्रेत्यांना गावात मुळीच फिरकू दिले नाही पाहिजे!अगदी बरोबर आहे, तुमचे म्हणणे! फिरते विक्रेते असलेल्या अशा लोकांकडून फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.हे फिरते विक्रेते असलेले लोक लबाड असतात. गावात फिरुन गावातील रिक्त घर हुडकून ठेवतात. हुडकून ठेवलेले हे घर एक दिवस फोडून लुटमार करतात. इतकेच नव्हे तर घरात मुली, महीला एकट्या असल्याचे पाहून कोणत्याही प्रकारची कृत्ये करु शकतात. अशा लोकांना गावात फिरकू द्यायचे नाही. ” या सारख्या गजाली रंगल्या आहेत,
गाडी क्रमांक एम. एच. 08 सी. 8475 या “सादीया” हे नाव पुढील काचेवर रंगवलेल्या पांढऱ्या गाडीमधून चार महिला व दोन पुरुष कोल्हापूर वरून आले आहेत. ते आपल्या गावात स्क्रॅच कूपन घेऊन फिरत असताना मी त्यांना अडवले व ग्रामपंचायतीची परवानगी घ्यायला सांगितली असे असताना देखील ते ग्रामपंचायत मध्ये अद्याप गेलेले नाहीत. तरी ते गावात फिरताना आढळल्यास त्यांना थांबवून माझ्याशी संपर्क साधण्यास लावावा”असे आवाहन “आपला गृप व गावची माणसे” या वाॅटसअप गृपवर केले. सौ. जाधव यांच्या या आवाहनाला गावातील तंटामुक्ती सदस्य तथा ग्रामस्थ दिपक जोशी यांनी त्वरीत “जबरदस्तं असच काम केलं पाहीजे. मी आहे तुमच्यासोबत” असा मेसेज केला. तर विद्याधर मांजरेकर यांनी, “खरच चांगला निर्णय घेतला” असा मेसेज केला. तुळशीदास नाईक यांनी ,”मॅडम चांगला निर्णय घेतला आहे. ” असा मेसेज करुन पाठिंबा दर्शवला. इतकेच नव्हे तर ग्रामस्थ निळकंठ बुगडे,
गजानन सातार्डेकर , रागिणी शिरोडकर
महेंद्र पेडणेकर व बाळा उर्फ नंदकिशोर राऊळ यांनीही पाठिंबा दर्शवला होता. इतकेच नव्हे तर पोलीस पाटील जाधव यांनी सावंतवाडी तालुक्यातील पोलीस पाटील गृपवरही याबाबत मेसेज करुन सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या.
गावात मागील चार दिवस रंगलेल्या या चर्चा व वाॅटसअप गृपवरील मेसेजना कारणही तसेच गंभीर होते. गेले चार गुरुवार दिनांक 3 फेब्रुवारी 2022 पासून आज रविवार दिनांक 6 फेब्रुवारी 2022 पर्यंत मागील चार दिवस ही चर्चा मळगांव पंचक्रोशीत रंगली आहे.वस एका गाडीमधून चार महिला व दोन पुरुष कोल्हापूर वरून आले आहेत. या चार व्यक्ती आपल्या गावात स्क्रॅच कूपन घेऊन फिरत असताना पहावयास मिळाल्या असून या बाबत मळगांवच्या पोलीस पाटील सौ. रोशनी जाधव यांनी त्यांना अडवल व ग्रामपंचायतीची परवानगी घेतली का असा प्रश्न विचारला असता त्यांनी उलट सुलट उत्तरे दिल्याचे व टोलवाटोलवी केल्याचे सौ. जाधव यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
पोलीस पाटील सौ. रोशनी जाधव यांनी याबाबत सावंतवाडी पोलीस व सावंतवाडी तालुक्यातील पोलीस पाटील यांना माहिती दिली असून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत सौ. जाधव यांनी कोणाला हे लोक गावात फिरताना आढळल्यास त्वरित याबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे. कारण या अनोळखी विक्रेत्यांकडून ग्रामपंचायत मध्येही कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही किंवा कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नसून तरीही ते गावात फिरत असल्याने जाधव यांनी,”हे लोक कुठे फिरताना आढळल्यास त्यांच्या कडून कोणत्याही वस्तू न घेण्याचे व त्यांना पैसे न देण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे. मळगांव ग्रामस्थ व गावातील महिलांनीही अशा विक्रेत्यांना गावात फिरकू न देण्याचा निर्धार केला आहे.
‘सादिया सेल्स अॅन्ड सर्विसैस स्क्रॅच स्क्रॅच अॅन्ड डिस्काऊंट आॅफर कार्ड ‘ या कंपनी मार्फत कंपनीच्या आॅफर कार्ड मध्ये स्क्रॅच केलेली वस्तू कार्ड धारक व्यक्तीला देण्याची स्किम गावा गावात फिरुन सुरु आहे. यासाठी या कंपनीची माणसे मागील काही दिवसांपासून गावा- गावात फिरुन व्यवसाय करत आहेत. या साठी एक आॅफर कार्ड या कंपनी मार्फत फिरणाऱ्या व्यक्तींकडून दिले जात आहे. 100 व 200 रुपये किंमत असलेल्या या पोस्ट कार्ड आकाराच्या कार्ड पेपरवर छापील असलेल्या या कार्डवर तपशीलवार नियमावली देण्यात आली आहे. या नियमावली मध्ये स्क्रॅच केलेल्या कार्डवरील वस्तूच दिली जाईल. वस्तू बदली करुन मिळणार नाही. वस्तू लागल्यावर रुपये 2 हजार 700 एवढी रक्कम भरावी लागले. रक्कम भरल्यावर वस्तू दिली जाईल. वस्तू न लागल्यास 200 रुपये परत दिले जातील. या मधील वस्तू एल. ई. डी. टीव्ही -22 इंची, शिलाई मशीन, फ्रिज, आटा चक्की, मोबाईल कव्हर व फिल्टर, मिक्सर व कुकर, मोटर, होम थिएटर, इंडक्शन,ओव्हन(9 लीटर) , टाॅवर फॅन, आचारी शेगडी व इस्त्री, ग्लास टॉप अशा वस्तू मिळतील. तर रुपये भरणाऱ्यांना घड्याळ, लंच बाॅक्स, इस्त्री व कुकर, लेडीज पर्स, टाॅर्च अशा वस्तू मिळतील अशी नियमावली देण्यात आली आहे.
कंपनी मार्फत देण्यात येत असलेल्या या कार्डच्या एका बाजूला असलेल्या या नियमावली सहीत या कंपनीचे मुख्य कार्यालय न्यु शाहूपुरी 3 री गल्ली, कोल्हापूर येथे मुख्य कार्यालय असल्याचे व पंढरपूर, सांगली, फलटण, देवगड, रत्नागिरी येथे शाखा कार्यालय असल्याबाबतचा तपशील देण्यात आला असून 8855991663 हा मोबाईल संपर्क क्रमांक तसेच सेल्समन पाकिजा मोबाईल संपर्क क्रमांक 9021910920 असे दोन संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर या कार्डवर, ‘ मी अर्थात कार्ड खरेदी करणाऱ्याने हे नियम आपण वाचले असून त्यानंतरच कार्ड खरेदी केले आहे. हे नियम मला मान्य आहेत. या आशयाचे कबूली पत्रही या कार्डवर असून त्या खाली पैसे भरणाऱ्याच्या स्वाक्षरीसाठी जागा सोडण्यात आली आहे.
या कार्डच्या दुसऱ्या बाजूला नियम व अटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये, ” ही कोणत्याही प्रकारची लाॅटरी सिस्टीम नसून फक्त विक्री वाढ योजना आहे. स्क्रॅच केल्या नंतर जी वस्तू लागेल तिच वस्तू ग्राहक 2 हजार 700 रुपये भरुन — कार्यालयाकडून घेऊन जाऊ शकतील. एकदा कार्ड किंवा वस्तू घेतल्या नंतर ती वस्तू किंवा कार्ड परत घेतले जाणार नाही. कुठल्याही कारणास्तव एखादी वस्तू कार्यालयात उपलब्ध नसल्यास त्या वस्तूचे पैसे परत दिले जाणार नाहीत. होम डिलिव्हरी हवी असल्यास वेगळा 500 रुपये चार्ज द्यावा लागेल. कुठल्याही वस्तूची वाॅरंटी 1 वर्षाची असेल. तर इलेक्ट्रॉनिक वस्तूची 6 महीने वाॅरंटी असेल. वस्तू खराब झाल्यास आॅफिस मध्ये आणून द्यावी लागेल. दुरूस्ती असल्यास 1 ते 10 दिवस लागतील. फिरत्या पिकाकडे वस्तू प्रतिकात्मक असतील. त्यात बदल होऊ शकतो.”, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
या कार्यालयाची वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 तर संध्याकाळी 6.00 ते रात्री 8.00 अशी असल्याची माहिती या कार्डवर देण्यात आली आहे. तसेच गरीब विद्यार्थ्यांना व घरकाम करत महिलांना पार्टटाईम विनाशुल्क गुंतवणूक व्यवसाय करण्याची संधी देण्यात येत असल्याची माहिती या कार्डवर (कुपन)
देण्यात आली आहे. तर या दुसऱ्या पानावर शेवटी पाकिजा हे नाव व नावासोबत 9021910920 हा मोबाईल क्रमांक देण्यात आला असून, ‘या सूचना वाचून मी हे कार्ड (कुपन) खरेदी करत असून ते मला मान्य असल्याची कबूली व ग्राहक सही असा रकाना देण्यात आला आहे. दरम्यान याबाबत मळगांव व पंचक्रोशीत सुरु असलेल्या चर्चा व गजालींनी खळबळ माजवली आहे.

*……………👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*💼LIC मध्ये RCA नेमणे आहेत!💼*
● जागा -10
● मानधन – 7000 (सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सोडायची गरज नाही)
● वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12 वी व पदवीधरांना प्राधान्य

_गृहिणी, महिला बचत गट कार्यकर्ता, सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, General Insurance एजन्ट._

*💁‍♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*

💁‍♂️आपले Application आमच्याकडे
आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू.

*उमेश गावडे : 9421082622*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!