कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मळगांव-सोनुर्ली गावच्या माळेतील दोन पुर्वसाचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार

*🛑मळगांव-सोनुर्ली गावच्या माळेतील दोन पुर्वसाचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार*

*🛑गावकरी व मानकरी राऊळ-गावकर यांचा दृढ विश्वास*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-सुखदेव राऊळ*

*🎴 सावंतवाडी,दि,:- २८ डिसेंबर*
सावंतवाडी तालुक्यातील गाव मळगांव व सोनुर्ली या दोन गावांच्या रक्षणार्थ सीमेवर असलेल्या श्री देव दोन पूर्वस या देवस्थानचा जत्रोस्तव आज होत आहे.दोन्हीही गावांचे रक्षणकर्त ठरलेल्या व दोन्ही गावांचे जोड देवस्थान असलेले हे दोन्ही देव मागील दोन वर्षातील कोरोना काळात आपल्या भक्त गणांचे रक्षणकर्ते ठरल्याने व दोन्ही गावांच्या माळेतील हा जत्रोत्सव यावर्षीचा शेवटचा असल्याने यावर्षी भक्तांची मोठी गर्दी असणार आहे.
मळगांव व सोनुर्ली या दोन्ही गावातील राऊळ-गावकर व मानकरी तसेच केळी-कुळ यांचे ग्राम दैवत असलेल्या दोन पुर्वस या देवांचा हा जत्रोत्सव हा या दोन्ही गावच्या माळेतील शेवटचा जत्रोत्सव असून यासाठी दोन्ही गावातील राऊळ व गावकर तसेच दोन्ही गावातील केळी-कुळ आणि मानकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उत्फुर्त पणे सहभाग घेऊन दर्शनाचा व सांगणे-गा-हाणे देतात. तर देवाची पूजा अर्चा अभिषेक पुर्ण झाल्यानंतर व भक्त मंडळी च्या दर्शनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री पालखी परिक्रमण केले जाते. दोन पुर्वीच्या या पालखी परिक्रमणावेळी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या डोंगरावर सीमेवर दोन्ही गावांचे रक्षणकर्ते सीमधडे मशाली पेटवून नृत्य करतात असे सांगितले जाते.
जत्रोत्सवाचे पालखी परिक्रमण पुर्ण झाल्यावर भक्त गणांच्या मनोरंजनसाठी खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचा पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग सादर होतो. यावर्षी ही मागील अनेक वर्षे व पिढ्यानपिढ्यान सुरु असलेल्या प्रथे प्रमाणे यावर्षी ही या जत्रोत्सवाला सोनुर्ली व मळगाव गावातील भक्तगणांबरोबरच दशक्रोशीतील भक्त गण मोठ्या प्रमाणात सहभागी होतील असे या दोन्ही गावच्या राऊळ व गावकर मानकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

_😍आली आली लग्नसराई आली…कशाला जाताय कोल्हापूर…बेळगाव ला आपल्या सावंतवाडीत आहे कपड्याचे उत्तम दालन….ते ही अगदी डिस्काउंट रेट मध्ये…*🥻👕🥼रोवस्त्र आणि राऊत आणि कंपनी…राऊत क्लाँथ सेंटर*🥻🥼👕_

*🔸राऊत आणि कंपनी*
▪️साडी
▪️शालू
▪️लेंगा
▪️घागरा
▪️सूट
▪️शेरवानी
▪️ट्रॅडिशनल गाऊन
▪️लग्नाचा बसता

*🔹रोवस्त्र*
मेन्स केस्युअल
फॉर्मल
शेरवानी
माला
फेटा इ.
सूट
विडींग कलेकशन

*🔸राऊत क्लाथ सेंटर*
वूमन स्पेशल ड्रेस
वनपीस
टॉप्स
वेस्टर्न गाऊन
फॅन्सी

*🏨आमचा पत्ता:-*
भाट बिल्डिंग, गांधीचौक
सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
02363 272254

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!