लवकरच मळगांव चौकात शिवछत्रपती अवतरणार
लवकरच मळगांव चौकात शिवछत्रपती अवतरणार!
मळगांव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आलेल्या ठरावाची होणार लवकरच अमंलबजावणी
सावंतवाडी (सुखदेव राऊळ)
एक आनंदाची व अभिमानाची ऐतिहासिक घटना लवकरच मळगांव गावात घडणार आहे. कारण सावंतवाडी-वेंगुर्ला व सावंतवाडी-शिरोडा मार्गावरु मळगांव चौकात ( चोरी) येथे शिवछञपती अवतरणार आहेत.
मळगांव ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत घेण्यात आलेल्या ठरावाची लवकरच अमंलबजावणी होणार आहे. यासाठी मळगांव सरपंच सौ. स्नेहल जामदार व उपसरपंच हनुमंत पेडणेकर तसेच सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य अशी प्रतिमा स्थापन करण्यासाठी काही दिवसांपूर्वी भिल्लवाडी गृपतर्फे मळगांव ग्रामपंचायत सरपंच सौ. स्नेहल जामदार यांना एक निवेदन देण्यात आले होते. या निवेदनावर शुक्रवार दिनांक 5 ऑगस्ट 2022 रोजी पार पडलेल्या मळगांव ग्रामपंचायतीच्या ग्राम सभेत या निवेदनावर चर्चा झाली. या चर्चेत एकमताने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा उभारण्यासाठीच्या या निवेदनाला परवानगी देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या चांगल्या कार्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले असे
सर्व मळगांव ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ तसेच आमचे सहकारी मित्र यांचे समस्त भिल्लवाडी ग्रुपतर्फे विशेष आभार आणि धन्यवाद मानण्यात आले आहेत.
भिल्लवाडी ग्रुप अध्यक्ष पांडुरंग श्रावण राऊळ तसेच इतर पदाधिकारी सचिन भगवान राऊळ, पांडुरंग विजय राऊळ, दिपेश गुरुनाथ राऊळ, विश्राम चंद्रकांत राऊळ, अंकुश मधुकर राऊळ, गजानन चंद्रकांत राऊळ, उत्तम परशुराम राऊळ, रोहित सोनल सावळ, कृष्णा नंदू राऊळ,महादेव नागेश राऊळ यांच्यासहित देवेंद्र राऊळ, प्रमोद राऊळ,रमेश राऊळ, प्रथमेश राऊळ,महेश राऊळ यांचे अभिनंदन होत आहे. या सर्वांच्या अथक पाठपुरावा व विनंतीला सन्मान देऊन मळगांव ग्रामपंचायत सरपंच सौ. स्नेहल जामदार व उपसरपंच हनुमंत पेडणेकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे भिल्लवाडी ग्रुप तर्फे आभार व्यक्त केले जात आहेत.