बीएसएनएल नेटवर्क चे काम प्रगती पथावर; जिओ टॉवर चे सर्वेक्षण येथे आठ दिवसात सुरु..

▪️भाजप घावनळे जि.प. विभागीय अध्यक्ष दिनेश शिंदे यांची माहिती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सद्गुरु घावनळकर

🎴माणगांव,दि.०१: माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएल नेटवर्क चे काम प्रगती पथावर आले असून येत्या आठ दिवसात जिओ टॉवरच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती भाजप घावनळे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष दिनेश शिंदे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, भाजपच्या घावनळे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष पदाची जबाबदारी ज्या विश्वासाने माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे यांनी दिली, त्या जबाबदारीने त्यांच्या तसेच भाजप पक्षाच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात व वाडीत बैठका घेऊन जनतेचे विविध प्रश्न जाणून घेतले. त्यात प्रामुख्याने मोबाईल टॉवर चा विषय समोर आला. त्यासाठी बीएसएनएल व जिओ टॉवर तातडीने उपलब्ध होण्यासाठी खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांना निवेदने देण्यात आली. त्याची दखल घेत बीएसएनएल कंपनीने तातडीने कामाला सुरुवात केली आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यासहित माणगाव खोऱ्यात जिओ कंपनी चे नेटवर्क उपलब्ध करून देण्यासाठी आमदार नितेश राणे व जिओ कंपनीच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक देखील पार पडली आहे. दरम्यान येत्या आठ दिवसात जिओ कंपनी कडून टॉवरसाठी सर्वे करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या नेटवर्क विरहित पुळास, महादेवाचे केरवडे, चाफेली, हळदीचे नेरूर, दुकानवाड, वसोली, उपवडे, आंजिवडे आदी गावांचा नेटवर्कचा प्रश्न सुटणार असल्याचे श्री. दिनेश शिंदे म्हणाले.

लोकांना नेटवर्कच्या कमतरतेमुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ऑनलाइन अभ्यासक्रमाचे तीन-तेरा वाजले आहेत. याला न्याय देण्याचे काम भाजप पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे भाजपच्या पाठीशी येथील जनता ठामपणे उभी राहील, असा विश्वास श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

भाजपच्या व राणे कुटुंबीयांच्या माध्यमातून येथील नेटवर्कचा प्रश्न संपुष्टात येत असल्याने येथील जनतेकडून अभिनंदन होत आहे. तसेच यापुढे अध्यक्ष या नात्याने जनतेचे विविध प्रश्न भाजपच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा प्रमाणिक प्रयत्न करणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

*💥……… प्रवेश सुरु ……… 💥*

_🌈तंत्र शिक्षण क्षेत्रात करियर करण्याची संधी.._

*🔥डिप्लोमा इन इलेक्ट्रिशीयन🔥*
_💫कालावधी – १ वर्ष_
_💫शैक्षणिक पात्रता – किमान १० उत्तीर्ण_

*🤷🏻‍♂️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*इन्स्पायर एज्यूकेशन, सावंतवाडी (7466A)*
*_📱संपर्क : 9422896699_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!