संजय पडते, सतीश सावंत ही आधीच हद्दपार झालेली टोळी..

▪️राणेंच्या पराभवाला कारणीभूत असलेल्या गद्दारांनी आता फक्त आपल्या राजकीय अस्तित्वाचीच काळजी करावी..

▪️भाजपा कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे यांचा पलटवार

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.०६: ज्यांची राजकीय ओळख ही माजी मुख्यमंत्री खासदार ‘नारायण राणे’ या नावाच्या सुर्यामुळे आहे, त्याच सूर्यावर थुंकण्याचे दु:साहस करणाऱ्या संजय पडते, सतीश सावंत यांच्यासारख्यांना नियती कधीच माफ करणार नाही. राणे ही व्यक्ती नव्हे, तर विकासाचा विचार आहे, त्यामुळे तुमच्या द्वेषाच्या थुंक्या तुमच्याच तोंडावर पडणार हेच तुमचं भवितव्य आहे. असा पलटवार भाजपा कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे यांनी केला.

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचा पराभव झाला तेव्हा त्यांच्या प्रचाराची धुरा याच संजय पडते आणि सतीश सावंत यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. काळाच्या ओघात सूर्याजी पिसाळ उघडे पडले आहेत. वास्तविक हे जर सच्चे असते, तर या पराभवाची जबाबदारी घेऊन त्यांनी राजकारणातुन तोंड काळे करून घरात बसायला हवे होते. पण हाव सुटलेल्या पिसाळांना थार कुठला होतोय? आज ज्या निर्लज्जपणे पत्रकार परिषदा घेत हे पिसाळ राणेंवर टीका करत फिरताहेत, ते पाहता यांना दिलेले हे काम पाहून अक्षरशः यांची किंव येते. अशी टीका श्री. विनायक राणे यांनी केली.

राणेंच्या ज्या सन्मानाने वावरत होता, तो आज तुम्हाला मिळतोय का हे स्वतःलाच विचारा आणि मगच तोंड वर करून फिरा. राणेंना हद्दपार करण्याच्या गोष्टी करणाऱ्या सतीश सावंतना तर यापूर्वीच कणकवलीतुन एकदा आणि त्यांच्या आंब्रड मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकांनी हद्दपार करून टाकलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतून त्यांची हद्दपारीही अशीच निश्चित आहे. संजय पडते यांना तर तिकडे पार देवगडचे जिल्हाध्यक्ष पद देऊन पक्षाने इकडे त्यांच्या होमटाऊनमध्ये डोक्यावर  वैभव नाईकांना आणून बसवले आहे. हाच तुमच्यावर असलेला विश्वास! आधी याचा विचार करा आणि मगच राणेंविरोधाच्या तळ्या उचला. वैभव नाईक यांनी २०२४ च्या गमजा मारण्याची काही गरजच नाही, हिंमत असेल तर आताच राजीनामा देऊन मैदानात उतरुन दाखवावे. कुडाळ मालवणमधून नाही त्यांचा बाडबिस्तारा गुंडाळून पार्सल कणकवलीत पाठवलं, तर राजकारण सोडेन. हिंमतीच्या बाता करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी राजीनामा द्यावाच, असे आव्हान भाजपाचे कुडाळ मंडल अध्यक्ष श्री विनायक राणे यांनी दिले आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!