सावंतवाडी रेल्वे स्थानकाजवळील तिठा बनलाय अपघातांचा साफळा
🟥सावंतवाडी रेल्वे स्थानकाजवळील तिठा बनलाय अपघातांचा साफळा
🟥स्थानिक व्यवसायिक तथा ग्रामस्थांकडून सिग्नल, गती रोधक व दिशादर्शक तसेच वेग मर्यादा फलक बसविण्याची विनंती
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी,२५: तीन दिशेने येणारे तीन मार्ग जिथे एकत्र येतात तो तिठा
किंवा चार दिशांनी येणारे मार्ग ज्या ठिकाणी एकत्र येतात अशा चौकात जर कोणत्याही प्रकारची सिग्नल व्यवस्था नसली किंवा जर तिथे वाहतूक पोलीस नसेल तर तिथे वाहतूक कोंडी होण्याबरोबरच अपघात होण्याची दाट शक्यता असते. मात्र तरीही गाव खेड्यातील तिठे व चौकांप्रमाणेच त्यापेक्षा जास्त मार्ग एकत्र येणाऱ्या मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण अधिक असते. दरम्यान सावंतवाडी तालुक्यातील मळगांव या शहरीकरण होत असलेल्या गावातील सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसरातील तिठ्यावर भरधाव वाहनांची प्रचंड रहदारी असतानाही तसेच या तिठ्यावर मागील अनेक वर्षात कित्येक अपघात होण्याबरोबरच वाहतूक कोंडीचे प्रमाण अधिक असतानाही सिग्नल किंवा वाहतूक पोलीस नसल्याने तसेच पावसाळ्यात या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून ये-जा करणे येथील स्थानिक पादचारी ग्रामस्थ व बाहेरील पादचारी यांना रस्ता पार करणे व येथून चालणे जिकिरीचे ठरत असल्याचे वास्तव आहे. याकडे वाहतूक विभाग सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक विभागाचे दुर्लक्ष असल्याची तक्रार येथील स्थानिक ग्रामस्थ व पादचारी यांच्या कडून होत आहे.
कोकण रेल्वे कोकणात आल्या नंतर मळगांव गावात बनलेल्या सावंतवाडी रेल्वे स्थानकाकडे तसेच शिरोडा-आरोंदा-रेडीच्या दिशेने ये-जा करता यावी तसेच सावंतवाडी कडून वेंगुर्लेच्या दिशेने फाटका ऐवजी येता-जाता यावे यासाठी मळगांव लाठी जवळील शिरोडा कडे जाणाऱ्या जुन्या मार्गाला वेंगुर्ले मार्गावरुन वळवून रेल्वे स्थानकावरुन शिरोडा-रेडी-आरोंदा च्या दिशेने वळविण्यासाठी बनलेला हा तिठा जणू अपघात,वाहतूक कोंडी व मृत्यूचा साफळा बनला आहे.
सोयी ऐवजी गैरसोय अधिक ठरत असलेल्या या तिठ्यावर मागील अनेक वर्षात दुचाकी, रिक्षा, मोटार वाहन, ट्रक-टेम्पो व बस यांच्यात समोरासमोर धडक बसणे, वळण घेताना दोन वाहने एकमेकांना घासून जाणे, रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी किंवा वाहनात चढणारे – उतरणारे तसेच दुचाकी वर बसणारे व दुचाकी वरुन उतरणारे प्रवासी यांना हलकी धडक बसणे आदी आणि विविध प्रकारचे किरकोळ अपघात अनेक घडल्याचे या तिठ्यावर चहा-वडा-पाव विक्रीचा व्यवसाय करणारे लक्ष्मीकांत शिरोडकर यांच्या कडून सांगतानाच या ठिकाणी तिन्ही दिशांनी सिग्नल बसविण्यात यावा किंवा कायमस्वरूपी वाहतूक पोलीस या तिठ्यावर बसविण्यात येण्याची सूचना करण्याबरोबरच या ठिकाणी दिशादर्शक व वेगमर्यादा फलक लावण्याबरोबरच स्पीडब्रेकर ( गती रोधक) बनविण्याची विनंतीवजा सूचना मांडली आहे. तसेच यासाठी मळगांव ग्रामस्थांनी व या स्थानकावरून मुंबई-गोवा कडे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांनी कोकण रेल्वे प्रशासनासहित सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री व प्रशासन यांच्या कडे लेखी मागणी करावी अशी विनंतीही केली असून वेळ प्रसंगी यासाठी मोर्चा-आंदोलन- उपोषण करण्याची तयारी ठेवावी अशी विनंतीही केली आहे.
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
📱9422436090
📱9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_