कोकणमनोरंजनमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

क्रीडा तपस्वी कै. शिवाजीराव भिसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त चित्रकला स्पर्धा..अनिल भिसे मित्रमंडळातर्फे आयोजन

 

▪️पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार स्पर्धा

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :निलेश लाड*

*🎴सावंतवाडी :* सावंतवाडी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलचे माजी शिक्षक क्रीडा तपस्वी कै. शिवाजीराव भिसे (सर) यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त अनिल भिसे मित्रमंडळाने पहिली व दुसरीमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. चालूवर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा जगन्नाथराव भोसले शिव उद्यानात होणार नाही. पालकांनी आपल्या घरीच मुलांकडून निसर्गचित्र (देखावा) या विषयावर चित्रे मेणाच्या रंगीत खडूंनी काढून घ्यावयाची आहेत. कागदाच्या मागच्या बाजूला मुलाचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता, पूर्ण पत्ता व मोबाइल नंबर लिहून आपली चित्रे २० फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत रत्नाकर माळी- श्रीकृष्ण प्रिंटिंग प्रेस वैश्य भवनसमोर गवळी तिठा (शिवाजी चौक) सावंतवाडी यांच्याकडे द्यावयाची आहेत. स्पर्धेचा निकाल भिसे सरांच्या स्मृतिदिनी २२ फेब्रुवारी रोजी जाहीर केला जाणार असून पहिल्या तीन क्रमांकांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांक आणि सर्वांना आकर्षित प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी एका मुलाचे एकच चित्र अपेक्षित आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पहिली व दुसरीच्या सर्व पालकांनी सहकार्य करावे व अधिक माहितीसाठी रत्नाकर माळी- ९४२०७३९१७३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे

 

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!