मळगांव मेस्त्री वाडी येथील जुन्या पुलाची, रस्त्याची व गणेश विसर्जन तळीची दुरावस्था
🟥मळगांव मेस्त्री वाडी येथील जुन्या पुलाची, रस्त्याची व गणेश विसर्जन तळीची दुरावस्था
🟥पुलाचे, रस्त्याचे व गणेश विसर्जन तळीचे नवनिर्माण न झाल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा निर्धार
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी,११.: खेदजनक आणि लज्जास्पद वास्तव ! अपघातात कारणीभूत ठरु शकणारी भयंकर, भयानक, भयावह व जीवघेणी परिस्थिती ? मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही. नाही राजकीय नेत्यांचे ! नाही शासकीय अधिकारी वर्गाचे ! नाही प्रशासकीय यंत्रणेचे! याकडे अजिबात लक्ष नसल्याचे कटू वास्तव सावंतवाडी शहरापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या मळगांव या प्रचंड लोकवस्ती असलेल्या व जवळ जवळ शहर बनत चाललेल्या झाराप-पत्रादेवी महामार्ग व कोकण रेल्वे मार्गावरील गाव असलेल्या मळगांवातील मध्यवर्ती मार्ग म्हणून सर्वाधिक वापर केल्या जाणाऱ्या मेस्त्री वाडा रस्त्यावरील पुलाची व येथील जुन्या गणेश विसर्जन तळीची आहे. इतकेच नव्हे तर केव्हाही कोसळून पडेल अशा जीर्ण स्थितीत असलेल्या या पुलाची तसेच पुर्णपणे माती, दगड यांनी भरलेल्या तळीची तात्पुरती डागडुजी येथील ग्रामस्थ मंडळींना करावी लागावी या सारखे दुसरे दुर्दैव ते कुठले ? ही बाब लक्षात घेऊन येथील ग्रामस्थ व वाहन चालक-मालक यांनी हा पुल, रस्ता व गणेश विसर्जन तळी दुरुस्त किंवा नवनिर्माण न झाल्यास सर्व आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार करताना तशी घोषणा केली आहे.
होय! हे पूर्ण सत्य आहे. गावातील सर्वात जुना व गुगल मॅपवरही असलेल्या या जवळजवळ साठ वर्षापुर्वीचा मार्ग असलेल्या मार्गावरील हा पुल केवळ दुरुस्तीच नव्हे तर पूर्ण नुतनीकरण व पुनर्निर्माण, पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्याचे मत व मागणी मळगांव मधील मेस्त्री वाडी, राणे वाडी, कुंभार वाडी,गावकर वाडी, ब्राह्मण आळी व देऊळ वाडी या प्रचंड लोकवस्ती तसेच पादचारी रहदारी बरोबरच दुचाकी, त्रिचाकी व चारचाकी रहदारी वाहतूक असलेल्या परिसरातील ग्रामस्थांसहीत झाराप-पत्रादेवी महामार्गाकडे जाण्याचा मध्यवर्ती मार्ग असलेल्या या मार्गावरील हा पुल तसेच येथील सर्वात जुनी गणेश विसर्जन तळीची दुरुस्ती श्रमदान करुन व गावाकडे वर्गणी मागून करावी लागावी या सारखे दुसरे कोणतेही दुर्दैव नाही, असा खेद व संताप हा पुल व तळी श्रमदानाने मागील दोन आठवड्यांपासून करत असलेल्या मळगांव मधील ग्रामस्थ तसेच व्यवसायीक संजय नाटेकर, सुधाकर नार्वेकर, हरीश उर्फ संतोष नार्वेकर तसेच तुळशीदास नाईक, विलास केणी,रंजन केणी, सुधाकर सोनुर्लेकर, तुळशीदास नार्वेकर, विवेक नार्वेकर, गुरु नार्वेकर,उदय फेंद्रे,बाब्या गोसावी, संजय कानसे, सुधाकर राऊळ, निलेश चव्हाण, प्रभाकर खडपकर, रामचंद्र केळुसकर, शंकर राणे, अरुण कानसे, अविनाश तळवडेकर, दिपक मळगांवकर ,सिध्देश तेंडोलकर
यांनी व्यक्त केला आहे. हे सर्वजण जुने व दगडी बांधकाम असलेल्या तसेच तीन पाईप (मुशी) असलेल्या जुन्या पुलाचे निखळून पडलेले दगड रचून व सिमेंट काँक्रीटीकरण करुन हे पुल वाचविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत. या सर्वानी येथील गणेश विसर्जन तळीचे बांधकाम करण्याबरोबरच या तळातील रेती, दगड जेसीबी लावून उपसण्याबरोबरच लांबी, रुंदी व सखलता वाढविली आहे.
दरम्यान हा रस्ता, पुल व तलाव लवकर नवनिर्माण न झाल्यास आगामी निवडणुकीत बहिष्कार घालून कोणतीही निवडणूक होऊ न देण्याचा निर्धार येथील ग्रामस्थांनी केला आहे.
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_