बल्ड बँक बंद करण्याचा प्रशासनाचा घाट ; …तर रक्ताच आंदोलन, युवा रक्तदाता संघटना आक्रमक
सावंतवाडी, दि.२२: अन्न व औषध प्रसाधनानं १० महिने वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक केली नाही. त्यांच्या अनुपस्थितीत रक्तसंकलन, चाचणी, रक्त प्रकिया आदी होत असल्याचं आढळून आलं. एलायझा न करता ब्लड बँक वितरीत केल्यात हे गंभीर असून तरतुदींची पुर्तता होईपर्यंत रक्तसंकलन, वितरण बंद करण्याचे आदेश सह आयुक्त अन्न व औषध प्रशासनानं दिल आहे. यामुळे रूग्णांची हेळसांड होत असून प्रसुती, अतिगंभीर परिस्थिती रुग्णांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. यामुळे युवा रक्तदाता संघटनेन आक्रमक पवित्रा घेत वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम पाटील यांना जाब विचारला. याबाबतचा रिपोर्ट ठाणे इथं पाठवत ही रक्तपेढी सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
सावंतवाडीची रक्तपेढी बंद करण्याचा प्रशासनाचा घाट असून ते कदापिही होऊ देणार नाही. चार दिवसांत रक्तपेढी सुरू न झाल्यास सावंतवाडीतील नागरिकांना घेऊन ‘रक्ताच’ आंदोलन छेडणार, यावेळी कोणत्याही प्रकारची घटना घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहिल असा इशारा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर,युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला आहे. तर रक्तपेढीतील रिक्तपद तातडीनं भरावीत अशीही मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी माजी आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, राघू चितारी, अर्चित पोकळे, मेहर पडते, गौतम माठेकर, प्रथमेश प्रभु, साईश निर्गुण, पडते आदी उपस्थित होते.