धान्य दुकानाचा परवाना कायमस्वरूपी मिळावा यासाठी अख्खे कारिवडे गाव बसले उपोषणाला
*🛑धान्य दुकानाचा परवाना कायमस्वरूपी मिळावा यासाठी अख्खे कारिवडे गाव बसले उपोषणाला*
*🛑कारिवडे ग्रामस्थांची एकजूट पाहून प्रशासन समोर निर्माण झाला पेच*
*🛑भाजपचे जिल्हा चिटणीस माजी उपसभापती तथा जिल्हा बँकेचे संचालक, महेश सारंग यांनी उपोषणाला पाठिंबा देऊन स्वतः उपोषण सुरू केल्याने आली रंगत*
*🛑महेश सारंग यांचे खंदे समर्थक नगरसेवक एक उदय नाईक, सुधीर आडीवरेकर, मंदार नार्वेकर यांनी रात्री अकरा वाजता उपोषण स्थळी दिली भेट*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी २३ फेब्रुवारी:*
कारिवडे रेशन धान्य दुकान चा परवाना कायमस्वरूपी मिळावा यासाठी ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज उदंड प्रतिसाद मिळाला,कारिवडे गावातील सुमारे ६००ते ७०० ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत, जोपर्यंत कारिवडे गावाला परवाना मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हलणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे,या भूमिकेचे पंचायत समिती माजी उपसभापती भाजपचे जिल्हा चिटणीस तथा जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांनी समर्थन करून स्वता ग्रामस्थांबरोबर उपोषण छेडले आहे, या उपोषणाला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे, मंगळवारी रात्री अकरा वाजता महेश सारंग यांचे खंदे समर्थक नगरसेवक उदय नाईक, सुधीर आडिवरेकर, मंदार नार्वेकर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.
गाव मौजे कारिवडे हे स्वतंत्र दोन महसुली कारिवडे व भैरवाडी गाव असून कारिवडे गावचे रेशन धान्य दुकान हे केरवडे जंगल कामगार सहकारी मजुर संस्था तालुका कुडाळ यांच्यामार्फत चालवण्यात येते ,मात्र कारिवडे गाव सावंतवाडी तालुक्यातील असून केरवडे हे गाव कुडाळ तालुक्यातील असल्याने केरवडे जंगल कामगार संस्थेचे धान्य दुकानावर कोणतेही नियंत्रण नाही.
याबाबत कारिवडे ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या ठरावानुसार कारिवडे विविध कार्यकारी सेवा सोसायटी तसेच महिला बचत गटाने रेशन धान्य दुकानाच्या परवान्याची मागणी केली पण अद्याप पर्यंत त्यांना तसा परवाना मिळाला नाही, म्हणून कारीवडे ग्रामस्थांनी वारंवार लेखी निवेदन देऊन पाठपुरावाही केला मात्र प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झाली नाही, जोपर्यंत कायमस्वरूपी धान्य दुकान मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका कारीवडे ग्रामस्थांनी घेतली व या भूमिकेला महेश सारंग यांनी जाहीर पाठिंबा देऊन उपोषण सुरू केले.
उपोषणाचा आज दुसरा दिवस असून आज बारा वाजता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात तहसीलदार समवेत उपोषणकर्त्यांची शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडणार आहे, व तद्नंतर उपोषणाची पुढील दिशा ठरणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले,मात्र अख्खा गाव घेऊन उपोषण करण्याची ही पहिलीच वेळ असून एवढ्या मोठ्या प्रमाणात उपोषण कर्ते जमा झाल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे,उपोषणकर्त्यांचे दिवस जसे वाढत जातील तस तसे उपोषण अधिक तीव्र होईल असा इशाराही देण्यात आला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_