सीएसनी पाठवल्या ‘ब्लड बँग्स’ ; देव्या सुर्याजींचा इशाऱ्यानंतर प्रशासन भानावर
_*सीएसनी पाठवल्या ‘ब्लड बँग्स’ ; देव्या सुर्याजींचा इशाऱ्यानंतर प्रशासन भानावर*_
*सावंतवाडी :* उपजिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकमध्ये असणाऱ्या कमतरतांबाबत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम पाटील यांच लक्ष वेधल होत. उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत रक्त स्टोअर करण्यात येणाऱ्या ‘ब्लड बॅग्सची’ कमतरता असल्याने रक्तदान शिबीरे घेण्यास अडचणी येत असून कोव्हीड काळात रक्ताची आवश्यकता असताना या बॅग्स अत्यावश्यक आहेत अशी मागणी देव्या सुर्याजी यांनी केली होती. तर बॅग्स उपलब्ध न झाल्यास भीक घालणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर प्रशासनाला जाग आली असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी याची दखल घेत तातडीनं 100 बँग्सचा पुरवठा केला. तर इतरही दुरावस्था लवकरच दुर होतील असा शब्द दिला. तर डॉ. श्रीपाद पाटील यांनी ओरोस ब्लड बँकचे प्रशांत सातार्डेकर यांना या बँग्स उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यानंतर लागलीच याची पुर्तता करण्यात आली.
यामुळे युवा रक्तदाता संघटनेचा मागणीला यश आले आहे. संघटनेचा माध्यमातून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, प्रशांत सातार्डेकर यांचे आभार मानण्यात आले आहेत.
बँग्स उपलब्ध करून देण्यात आल्यानं रुग्णांची गैरसोय दुर झाली आहे. तर वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम पाटील यांनी रक्तपेढीतील दरवाजा, खिडक्या आदींचा दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंतांना पत्रव्यवहार करत हे काम तातडीनं करण्याची मागणी केली.

