Skip to content
- सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीतील दरवाजे, खिडक्या यांची दुरावस्था झाली असून येथील एसी बंद अवस्थेत आहेत. या दोन्ही समस्यांबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षकांच लक्ष वेधल्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागास अर्ज करत ही गैरसोय दुर करण्याबाबतची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली होती. मात्र, २ महिने उलटल्यानंतर देखील कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नव्हती. एसी बंद असल्यानं रक्तदात्यांना रक्तदान केल्यानंतर अस्वस्थ वाटू लागतं. तर यामुळे मोठी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता आहे. तर ब्लड स्टोरेज रूममधील मशीनही बंद ठेवाव्या लागत आहे. यामुळे येत्या १५ ऑगस्टच्या आत ह्या समस्या सार्वजनिक बांधकाम आणि विद्युत विभागामार्फत दुर न झाल्यास जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत ध्वजारोहणानंतर अधिकाऱ्यांना जाग्यावरून हलू दिल जाणार नाही असा इशारा युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून दिला आहे. कोरोनाकाळ चालू असून दिवसाला १० ते १५ बाटल्या रक्ताची आवश्यकता भासत आहे. लोकांचे होणारे हाल लक्षात घेऊन तातडीनं दुरूस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलना दरम्यान जी काही परिस्थिती उद्भवेल याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा उपविभागीय अभियंता अनिल आवटी यांना युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला. तर समस्यांबाबत लक्ष वेधल.
दरम्यान, श्री. आवटी यांनी तातडीनं याची दखल घेत डेप्युटी इलेक्ट्रीकल श्री. बंड यांना संपर्क साधत तातडीनं एसी दुरूस्तीचा सुचना दिल्या. यानंतर या टिमन उपजिल्हा रुग्णालयातील परिस्थितीची पहाणी केली. तर दरवाजे, खिडक्या यांच्या सुधारणांबाबत तातडीनं उपाययोजना करणार असल्याची ग्वाही अनिल आवटी यांनी दिली. यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष भाई देऊलकर, राघू चितारी, अनिकेत पाटणकर, वसंत सावंत आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!