“त्यांनाही लागते भूक”…मुक्या प्राण्यांच्या पोटासाठी केली खास अन्नाची सोय
मंगेश तळवणेकर,देव्या सूर्याजी ठरत आहेत मुक्या प्राण्यांचे वाली
विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना आणि युवा रक्तदाता संघटनेमार्फत भटक्या कुत्र्यांना अन्नाची सोय
विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना आणि युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी यांच्या माध्यमातून मागच्या लॉकडाउनच्या काळात अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले होते.त्यातील एक विशेष उपक्रम होता तो म्हणजे ‘भटक्या मुक्या जनावरांना अन्न पाण्याची सोय करणे’. आपल्या परिसरातील अशा असंख्य पशुपक्ष्यां चा यामुळे जीव वाचला होता या मिनी लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.कारण हॉटेल बंद असल्याने भटक्या कुत्र्यांना खाद्य मिळणे अवघड होऊन बसले आहे तसेच शासन आदेशानुसार लोकांची वर्दळही कमी असल्याने भटक्या कुत्र्यांचा तसेच अशा असंख्य प्राण्यांचा वाली कोणीच नाही हे लक्षात घेत विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष,माजी शिक्षण आरोग्य सभापती श्री मंगेश तळवणेकर आणि युवा रक्तदाता संघटना यांच्या वतीने परत एकदा भटक्या कुत्र्यांना जेवणाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे आज पासून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.
यावेळी श्री.मंगेश तळवणेकर,श्री देव्या सूर्याजी,अर्चित पोकळे,साईश निर्गुण,देवेश पडते,पार्थिल माठेकर,मेहर पडते,अनिकेत पाटणकर,गौतम माठेकर,संदिप निवळे,मंथन राणे,अभिजीत गवस,राघवेंद्र चितारी,विनायक गांवस,श्री सखाराम शेर्लेकर,गजानन परब,राजू गोवेकर इ. उपस्थित होते.
‘कोरोना प्रतिबंधक उपाय पाळत शासनाने पुन्हा एकदा हॉटेल व्यावसायिकांना हॉटेल सुरू करण्याची परवानगी द्यावी’ असेही यावेळी बोलण्यात आले.
गेल्या मार्चमध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर मंगेश तळवणेकर माजी शिक्षण आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी लॉकडाऊन मध्ये सहा महिने मुक्या प्राण्यांना सावंतवाडी शहर ते मळगाव स्टेशन तसेच आंबोली आणि इन्सुली घाटी चा परिसर इत्यादी ठिकाणी सर्व भटक्या कुत्र्यांना जेवण आणि पाण्याची सोय केली होती आंबोली घाटात माकडांना खाद्य पाणी यांची व्यवस्था केली होती तसेच जनावरांना गोरगरिबांना रुग्णांना जनतेला धान्यापासून ते मुक्या बैल व गाईंना ओला चारा व पाण्याची व्यवस्था देखील केली होती लााँक डाऊन संपेपर्यंत कुत्र्यांना व मुक्या जनावरांना परत एकदा मदत करण्याचा संकल्प केला आहे “आपापल्या भागात बिल्डिंगच्या खाली वाडी वस्तीत त्यांना खाद्य जेवण पाणी द्या तुम्हाला समाधान वाटेल कृपया प्रत्येकाने यावेळी आपण खारीचा वाटा म्हणून संपूर्ण जिल्ह्यात हे काम करावे” असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.