कोकणमहाराष्ट्ररायगडसामाजिक

सर्वसामान्य समाज आणि आपला देशच आपला नारायण आहे असे मानून कृष्णामामाची देशसेवा : भय्याजी जोशी

🛑सर्वसामान्य समाज आणि आपला देशच आपला नारायण आहे असे मानून कृष्णामामाची देशसेवा : भय्याजी जोशी

🛑उद्योगपती वसंतशेठ उदेग यांचा कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्काराने भय्याजी जोशी यांच्या हस्ते सन्मान

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,ता.२२- सर्वसामान्य समाज आणि आपला देशच आपला नारायण आहे असे जीवनामध्ये मानून कृष्णामामानी देशसेवा केली असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकारणी सदस्य भय्याजी जोशी यांनी केले.

दापोली शिवाजी नगर येथील नवभारत छात्रालाय सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृहात सोमवारी मामा महाजन स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने चिपळूण मधील दानशूर व्यक्तिमत्व प्रसिद्ध उद्योगपती वसंतशेठ उदेग यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्व सरकार्यवाह अ.भा कार्यकारणी सदस्य भय्याजी जोशी यांच्या हस्ते अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.या वेळी मार्गदर्शन करतांना भय्याजी जोशी बोलत होते.कलीयुगामध्ये संघटित शक्ती हाच ईश्वर असून संघटित शक्ती निर्माण करण्यासाठी सामान्य व्यक्तीमध्ये त्याग, समर्पण या भावना रुजविणे गरजेचे असल्याचे मत जोशी यांनी व्यक्त केले.भारतावर अनेक वर्ष परकीयांनी राज्य केले, मात्र असे असले तरी सध्याची स्वातंत्र्यानंतरची पिढी ही भाग्यवानच असल्याचे आपल्याला नमूद करावे
लागेल. कारण स्वातंत्र्यासाठी ज्या काही हालअपेष्ठा आपल्या पूर्वजांनी सहन केल्या त्या आपल्या वाट्याला आल्या नाहीत. देशात परिवर्तन होत असून हे परिवर्तन कोणा एका व्यक्तीमुळे होत नसल्याचे सांगतानाच भारत वैश्विक शक्ती म्हणून उदयास येत आहे. आपले वेद, योग, संस्कृती ही जगाने स्वीकारली असल्याचे दाखले देतानाच हिंदुत्व व भारत हे संपणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सामान्य व्यक्ती त्याग, समर्पण करत नाही तोपर्यंत श्रेष्ठत्व येत नसल्याचे सांगतानाच छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यांच्या समवेत दऱ्याखोऱ्यातून फिरणारी सामान्य माणसे होती, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा श्रेष्ठ बनू शकतो त्यासाठी पूर्वइतिहास, घराणेशाही ही गरजेची नसल्याचेही त्यांनी सांगितले.कळवंडे गावातील प्रथितयश शेतकरी, उद्योजक वसंतशेठ उदेग यांनी स्वतःबरोबरच आपल्या
सोबतच्या शेतकऱ्यांबरोबर शेतीमध्ये विविध प्रयोग केले. त्यामुळे त्या परिसराचा भौतिक विकास झाला असून अशी गावे ही देशामध्ये प्रेरक पर्यटन केंद्र
म्हणून उदयाला येण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षात विविध पुरस्कार देताना राज्य व राष्ट्रीय पातळीवर सरकारी अधिकारीही व शिफारशींशिवाय कार्यरत असलेल्या व्यक्तींचा शोध घेत असून हे परिवर्तन निश्चितच स्वागतार्ह असल्याचे जोशी
यांनी या वेळी सांगितले. कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त
करताना वसंतशेठ उदेग म्हणाले की, घरामध्ये असलेल्या कडक शिस्तीच्या वातावरणात आपण आपल्या जीवनाला सुरवात केली असून शिस्त व काटकसर हे वडिलांचे गुण आपण अंगीकारले आहेत. त्यामुळे आपण विविध पातळीवर यशस्वी ठरलो असून हा पुरस्कार वडिलांना समर्पित करतआहोत. कळवंडे गावातील शेतकऱ्यांनी आपल्याला
साथ दिल्याने विविध प्रयोगामध्ये यशस्वी वाटचाल केली.हा त्यांचा हा सन्मान असून छात्रालयात मी शिक्षण घेतले असल्याने व माझ्या समवेतचे
अनेकजण जीवनात यशस्वी झाल्याने छात्रालयांमुळे
विद्यार्थी जीवनाच्या कोणत्याही प्रसंगाला तयार
होतात असे त्यांनी सांगितले. शाल,सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन भय्याजी जोशी यांच्या
हस्ते वसंतशेठ उदेग यांचा सन्मान, करण्यात आला. वसंतशेठ उदेग यांनी पुरस्काराच्या रकमेएवढीच स्वतःकडील रक्कम चिपळूण मधील खेर्डी येथील कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केली. व्यासपिठावर विभागीय
संघचालक राजन दळी, कै. मामा महाजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. बिपीन पाटणे, कार्यवाह श्री. गंगाराम इदाते, कोषाध्यक्ष श्री. दीपक महाजन,वसंतशेठ उदेग,सौ. वर्षाताई उदेग आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. दीपक महाजन यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. प्रसाद करमरकर यांनी आभार मानले. श्रावणी गोंधळेकर हिने गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमला माजी आ.विनय नातू,उद्योजक अजय मेहता, कळवंडे गावचे सरपंच संजय नाचरे,माजी नगरसेवक अजय मेहता,दयाळ उदेग ,सौ.श्रद्धा दयाळ उदेग,कु.रुत्वी दयाळ उदेग ,कुणबी शिक्षण मंडळ अध्यक्ष बी.आर भुवड,श्री.निर्मळ,प्रकाश खेडेकर, चंद्रकांत मांडवकर,अँड. अजय कांबळे , विठ्ठल कान्हेरे,संतोष उदेग,विजय पांनगले,संदीप उदेग,शांताराम लाबे,शालिनी लांबे,गुरुनाथ उदेग,चंद्रकांत उदेग,योगेश वरपे,सुहास शेवडे आणि दत्त एजन्सी परिवार उपस्थित होते.आमदार शेखर निकम,अर्बन बँक संचालक उमेश काटकर,पंचायत समिती सदस्य पाडुरंग माळी, विलास चिपळूणकर,अमितकुमार मांडवकर ,राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मिलिंद कापडी,दिलीप माटे,आयकॉन स्टीलचे एरिया मॅनेजर, अधिकारी ,सुरेशभाई शहा आणि मित्रपरिवार यांनी दत्त एजन्सी येथे जाऊन वसंतशेठ उदेग यांना शुभेच्छा देत अभिनदं केले.तर काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत यादव ,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष जयंत खताते,
आ.भास्करराव जाधव यांचे स्वीय सहाय्यक संतोष तांदळे,चिपळूण नागरी पतसंस्था संचालक सूर्यकांत खेतले, काँग्रेस माजी तालुका अध्यक्ष भरत लब्दे यांनी फोनवर शुभेच्छा दिल्या.

———————————————
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!