कळणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा
🛑 कळणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा
⚫..अन्यथा खनिकर्म विभागाकडे आत्मदहन करणार …अभय देसाई
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ ब्यूरो न्युज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग
*🎴दोडामार्ग,ता१६:-कळणे येतीत शासन प्रस्थापित मायनिंग प्रकल्पाची तटरक्षक मानव निर्मित भिंत बंधारा कोसळून साठवण केलेली खनिज माती व प्रचंड पाण्याचा साठा लोंढा कळणे धवडकीवाडीवरील वस्ती व शेतकऱ्यांच्या जमीन क्षेत्रामध्ये घुसून घरांचे, भातशेती, फळबाग लागवड, विहिरी, शेततळी, ग्रामीण पाणी पुरवठा, नळयोजना, नदीपात्र यांचे अतोनात नुकसान झालेले असताना पंचनामा होऊनही नुकसान भरपाई मिळत नाही म्हणून दोन वेळा उपोषण करावे लागले तरी आश्वासनापलीकडे काही झाले नाही म्हणून अभय पांडुरंग देसाई खनिकर्म विभागा कडे आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला.
या पुरात साग, फणस व जंगली झाडे हि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली. त्याचसोबत शेत-बागायती, सुपीक जमीन ओसाड व पडीक झालेल्या आहेत. कळणे गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन रस्त्यावर आलेला आहे. तरी आपले प्रशासन जागे होत नाही. शासनाने रीतसर पंचनामे केलेलं असून आम्हाला ते मान्य आहेत. असे असूनही अद्याप शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्या संधर्भात काही मागण्यासाठी आम्ही दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी कळणे येथे उपोषण जाहीर केले होते.
माननीय तहसीलदार दोडामार्ग यांनी सर्व उपोषण कर्त्यांसमोर जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासन व संबंधित कार्यालयाशी चर्चा करून १५ दिवसात म्हणजेच सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत निर्णय घेऊन मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन देऊन उपोषण स्थगित केले होते
. त्यानंतर दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजी गुरे ढोरे आणि सर्व संसार घेऊन प्रांत कार्यालय समोर आंदोलन केले होते तेव्हाही ३० ऑक्टोबर पर्यंत नुकसानभरपाई भेटेल असे फक्त गाजर दिले गेले परंतु कळणे बंधारा दुर्घटनेला जवळपास ६ महिनेच काळ उलटून गेला असू अजूनही नुकसानग्रस्त शेतकरी न्याय मिळण्यासाठी ताटकळत आहे. अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसून ह्या संधर्भात जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये भेट देऊन पाठपुरवठा केला होता. परंतु अजूनही न्याय मिळालेला नाही. दिलेल्या शब्दानुसार माझ्या आणि शेतकरी वर्गाच्या भावना लक्षात घेऊन आपण लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा न्याय मिळाला नाही ह्यासाठी मी अभय पांडुरंग देसाई आपल्या खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये ” आत्मदहन करणार आहे. आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे माझ्यावर “आत्मदहन करण्याची वेळ आलेली आहे. तरी हा इशारा गांभीर्याने घ्यावा कारण माझ्याजवळ अजून काहीही पर्याय राहिलेला नाही आणि याचे जे काही परिणाम होतील त्या सर्वांना आपण आणि प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

