फक्त रवी जाधवचा स्टाँल हटवण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेची धडपड…
पोलिस संरक्षण सोबत घेऊन कारवाई साठी आले होते नगरपालिकेचे कर्मचारी…
सावंतवाडी,दि.२४:- शहरात गेले अनेक दिवस रवी जाधव यांचा स्टाँल हटवण्याचा प्रकार नगरपालिकेने सुरु केला होता. याबाबत काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने रवी जाधव याचा स्टाँल अनाधिकृत आहे यासाठी नगरपालिकेने कारवाई केली होती.यानंतर याबाबत उपोषणही छेडले होते यानंतर आम.दिपक केसरकर यांनी रवी जाधव यांचा प्रश्न नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता यानंतर नगरविकास विभागाकडून परवानगी बाबत पत्रही रवी जाधवला मिळाले आहे तसेच तोंडी आदेश मुख्याधिकारी यांनाही दिले आहेत.यानंतर काल रवी जाधव यांनी मुख्याधिकारी जावडेकर यांना आपण स्टाँल लावत आहे असे पत्रही दिले.यानंतर स्टाँल लावल्यानंतर आज नगरपालिकेचे काही अधिकारी पोलिस संरक्षण घेऊन आज रवी जाधवचा स्टाँल काढण्यासाठी आले मात्र स्थानिक दुकानदार तसेच काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्टाँल काढण्यास विरोध केला यानंतर नगरपालिकेच्या अधिकारयांनी २४ तासात स्टाँल काढण्याची मुदत दिली आहे.बराच वेळ हा वाद सुरु होता यावेळी सुनिल पेडणेकर,संजय पेडणेकर,मंगेश तळवणेकर,रवी जाधव उपस्थित होते. सावंतवाडी नगरपालिकेला रवी जाधव ह्याच एका व्यक्तीचा स्टाँल अनाधिकृत दिसत आहे का??सावंतवाडीत असे किती व्यापारी अनाधिकृत रित्या आपला स्टाँल लावतात त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत सावंतवाडी नगरपालिका प्रशासनात नाही का??की कोणाचा दबावाखाली प्रशासन काम करतय का असा सवाल उपस्थित केला जात आहे.