आरोग्यकोकण

कोविड १९ लसीकरणासाठी धावली लालपरी….

*कोविड १९ लसीकरणासाठी धावली लालपरी ; आम.नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती डॉ.अनिषा दळवी यांचे सुयोग्य नियोजन*

!..भाजप तालुकाअध्यक्ष प्रविण गवस व बोडदे सरपंच विनायक शेटये यांच्या प्रयत्नांना यश..!

दोडामार्ग / प्रतिनिधी

कोविड १९ साठीच्या लसीकरण मोहीमेमध्ये आता ४५ वर्षांवरील सगळ्यांना प्राधान्यक्रमाने लस देण्यात येत आहे.जिल्हा परीषद आरोग्य विभाग व तालुक्यात कार्यरत आरोग्य कर्मचारी यांच्या एकत्रित नियोजनातून गावागावात कोविड लसीकरण जोर धरत आहे.

सदरील लसीकरण हे ऑनलाईन असल्याने ज्या गावांत नेटवर्क नाही अशा भागातील लोकांचे लसीकरण करताना बऱ्याच अडचणी येत होत्या,मात्र या अडचणींवर मात करत आम.नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी यांनी तालुक्यात प्रथमच भारतीय जनता पार्टी दोडामार्ग व ग्रूप ग्रामपंचायत बोडदे यांच्या एकत्रित प्रयत्नांतून खानयाळे,बोडदे व शिरंगे या गावांतील ४५ वर्षावरील लोकांच्या लसीकरणासाठी एसटी बस उपलब्ध करून दिली.याकामी प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी व श्री.वैभव पडोळे आगारप्रमुख राज्य परीवहन मंडळ,सावंतवाडी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

बोडदे,खानयाळे व शिरंगे परीसरातील लोकांचे लसीकरण व्हावे अशी आग्रही मागणी आरोग्य विभागाकडे लावून धरणारे बोडदे सरपंच विनायक शेटये यांनी नेटवर्कची असलेली समस्या डॉ.दळवी यांच्याकडे मांडल्यानंतर आज प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी येथे लस उपलब्ध होताच लसीकरणासाठी राज्य परीवहन मंडळाच्या एसटी बसची सोय उपलब्ध करुन दिली.अशा प्रकारे वाढत्या कोरोना प्रादुर्भावात दळणवळणाच्या सुविधा बंद असताना ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली व सध्या बंद असलेली ग्रामीण भागातील लालपरीच ग्रामीण भागासाठी धावून आली.

आज प्राधान्याने बोडदे,शिरंगे व खानयाळे या गावांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी येथे २०० लसी उपलब्ध झाल्या असून त्याकरिता खानयाळे गावातील पहिल्या ४० लोकांना घेऊन खानयाळे येथून एसटी बसची पहीली फेरी प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी करीता मार्गस्थ झाली.त्याचे उद्घाटन सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती सदस्या सुनंदा धर्णे,भाजप तालुकाअध्यक्ष प्रविण गवस,सरपंच विनायक शेटये,एसटी चालक राजा दळवी,कर्मचारी नंदकिशोर गावडे,कोतवाल रामचंद्र तोरस्कर,संजय गवस,ग्रामसेविका श्रीम.जगताप व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!