पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची सोमवारी सायंकाळी उशिरा कसाल पोलीस दूरक्षेत्राला अचानक भेट

🛑पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची सोमवारी सायंकाळी उशिरा कसाल पोलीस दूरक्षेत्राला अचानक भेट

पर्यटकांना पोलिसांकडून त्रास होणार नाही पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचे कसाल येथे आश्वासन

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻प्रतिनिधी सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग,१६- पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा कसाल पोलीस दूरक्षेत्राला भेट दिली. यांनी यावेळी कसाल दूरक्षेत्राची पाहणी करून कसाल बाजारपेठेतील नागरिकांशी चर्चा केली हे दूरक्षेत्र पूर्णपणे नादुरुस्त असून या क्षेत्राची डागडुजी आवश्यक आहे यासाठी सहकार्य करावे अशी विनंती यांनी नागरिकांना केली. याच वेळी कसाल मधील प्रश्नांबाबतही चर्चा केली या चर्चेमध्ये नागरिकांनी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक पोलिसांकडून नाहक त्रास होतो तो थांबवा अशी विनंती केली मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल हे गाव असून येथून जिल्ह्याच्या पर्यटनाचा मालवणकडे जाण्याचा मार्ग आहे .मात्र या मार्गावर वाहतूक पोलिसांचा पर्यटकांना प्रचंड त्रास होत असतो. इतर जिल्ह्यामध्ये गेल्यास पोलिसांचा त्रास दिसत नाही. केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्रास मोठ्या प्रमाणात आहे जिल्ह्यात येणाऱ्यांना पर्यटकांच्या गाड्या किंवा पर्यटक नियमात वागत नसतील तर यांच्यावर कारवाई करावी मात्र गाड्या तपासण्याच्या नावाखाली यांना होणारा त्रास कमी व्हावा. अन्यथा जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांवर यांचा मोठा परिणाम होऊ शकतो अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली. यावर पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे म्हणाले कोरोना स्थितीमुळे गाड्या तपासणे आवश्यक होते .त्यामुळे या गाड्या तपासल्या जात होत्या आता ही स्थिती बर्‍यापैकी सुधारत आहे .त्यामुळे यापुढे जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांना पोलिसांचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. कसाल हायस्कूलकडे महामार्ग क्रॉसिंग करणे मुलांसाठी धोकादायक आहे. यासाठी याठिकाणी उपाययोजना करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आपण आणि कसालमधील नागरिक अशी बैठक घेऊन या ठिकाणी यासाठी एकत्रित प्रयत्न करूया असेही श्री दाभाडे यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, महिलांची सुरक्षा, जनतेची सुरक्षा आदी विषयांवर श्री दाभाडे यांनी नागरिकांशी संवाद साधला नागरिकांच्या काही समस्या असतील तर त्या जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा कसालमध्ये येणार असलेचे सांगितले पंचायत समितीचे माजी सदस्य अवधूत मालवणकर व येथील व्यापारी संघाचे अध्यक्ष नवीन बांदेकर आदीसह व्यापारी कसाल बाजारपेठेतील नागरिक उपस्थित होते .

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!