कोनाळ व सरगवे आयनोडे पुनर्वसन ग्रामस्थांचा कोविड लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद
*कोनाळ व सरगवे आयनोडे पुनर्वसन ग्रामस्थांचा कोविड लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद*
दोडामार्ग / प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रस्तरावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परीषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोनाळ ग्रामपंचायत,तालुका आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी कर्मचारी व इतर ग्रामस्थ यांच्या सहकार्याने कोनाळ ग्रामपंचायत कार्यालय व सरगवे आयनोडे पुनर्वसन येथे उपकेंद्रस्तरावरील लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
येणाऱ्या काळात 45 वर्षावरील व्यक्तीना जास्त प्रवास करावा लागू नये. प्राथमिक आरोग्य केंद्र वरील लसीकरणासाठी असलेली गर्दी कमी करणे. गाव पातळीवरच लोकांना लसीकरण उपलब्ध करून देणे याकरिता कोनाळ व सरगवे आयनोडे पुनर्वसन उपकेंद्र येथे लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचे डॉ.अनिषा दळवी यांनी सांगितले. कोनाळ परीसरातील गावात नेटवर्क सुविधेचा अभाव असल्याने कोनाळ हा केंद्रबिंदू ठेवून लसीकरणावर भर देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.
यावेळी दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य अंतर्गत कोनाळ व सरगवे आयनोडे पुनर्वसन उपकेंद्र येथे प्रत्येकी १०० नागरीकांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले.कोनाळ व सरगवे आयनोडे पुनर्वसन उपकेंद्रे निश्चित झाल्यानंतर लसीकरणाचे महत्त्वाचे काम मार्गी लावणाऱ्या सर्व आरोग्य,तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचे डॉ.अनिषा दळवी,राजेंद्र निंबाळकर,पंचायत समिती सदस्य बाळा नाईक,शैलेश दळवी व कोनाळ सरपंच पराशर सावंत यांनी अभिनंदन केले आहे.
कोनाळ गावात उपलब्ध झालेल्या १०० लसींचे सुयोग्य नियोजनाने करुन गावातील अधिकाधिक ग्रामस्थांना लसीकरणाचा लाभ यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परीषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती डॉ.अनिषा दळवी व कोनाळ सरपंच श्री.पराशर सावंत तसेच साटेली भेडशी वैद्यकीय अधिकारी श्री.बी.डी.राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच प्रितम पोकळे,पांडुरंग लोंढे,सुभाष लोंढे,आरोग्य सहाय्यक एम.बी.गवस,आरोग्यसेवक जे. बी. तुळसकर, आरोग्यसेविका आर. एन. क्षीरसागर, श्री. तळणकर, पी.डी.एडगे,एम.आर.ठाकर,पुजा जाधव, आशा स्वयंसेविका शिवानी शेटवे,गीतांजली बर्वे, मनाली शेलार,ग्रामपंचायत कर्मचारी गोपाळ ठाकर, चंद्रकांत लोंढे व ग्रामस्थ उपस्थित होते.

