ओटवणेत गावात गाव चव्हाटा कार्यक्रम संपन्न_
*_🛑ओटवणेत गावात गाव चव्हाटा कार्यक्रम संपन्न_*
*_🛑गावठण वाडी कला क्रीडा मंडळाचे कार्य कौतुकास्पद, डॉ सावंत*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-अक्षय गांवकर*
*🎴सावंतवाडी,दि,,१० जानेवारी*
ओटवणे गावठणवाडी कला क्रीडा व मित्र मंडळाचे शैक्षणिक सामाजिक व कला क्रीडा क्षेत्रातील उपक्रम कौतुकास्पद असून मंडळाच्या अशा विधायक उपक्रमातून गावाच्या विकासाला चालना मिळते. त्यामुळे मंडळाच्या या कार्याचा ग्रामीण भागातील मंडळांनी आदर्श घ्यावा असे आवाहन समाजसेवक डॉ चंद्रकांत सावंत सर यांनी केले.
ओटवणे गावठणवाडी कला क्रीडा व मित्र मंडळाच्या ९ व्या गांव चव्हाटा महोत्सवाच्या उद्द्घाटन प्रसंगी डॉ चंद्रकांत सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संजय गांधी निराधार योजनेचे सावंतवाडी अध्यक्ष अशोक दळवी, सरपंच उत्कर्षा गावकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष रवींद्र गावकर, माजी सरपंच आत्माराम गावकर, माजी उपसरपंच बाबाजी गावकर. वाफोली माजी उपसरपंच मंथन गवस, सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, व्यसनमुक्ती केंद्राचे गुरु कोटकर, ग्राम पंचायत सदस्य रत्नमाला गावकर, माजगावचे संजय माजगावकर, तिलारी पाटबंधारे खात्याचे उप अभियंता संतोष कविटकर, हरीहर मयेकर, एकनाथ गावकर, तलाठी डी पी पास्ते, संजय कविटकर, विश्वनाथ भिसे, मंगेश चिले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अशोक दळवी यांनी मंडळाच्या एकजूटीचे कौतुक करीत युवकांची ही एकजूटच मंडळाला निश्चित ध्येयाकडे देणारी असल्याचे सांगितले. सिताराम गावडे यांनी या मंडळाबाबत आदर्शवत मंडळ असे गौरवोद्गार काढून या मंडळाचा उद्देश आणि ध्येय गावाला सर्वांगीण विकासाकडे नेणारे असून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी डॉ चंद्रकांत सावंत यांनी आपल्या सन्मानाची शाल व श्रीफळ प्रसिद्ध दशावतारी कलाकार विठ्ठल गावकर यांना प्रदान केली.
या कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, प्रशासन, राजकीय व पत्रकारिता या क्षेत्रात योगदान दिलेल्या डॉ चंद्रकांत सावंत, गुरु कोटकर, संतोष कविटकर, सिताराम गावडे, अशोक दळवी, हरिहर मयेकर, देवेंद्र नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती विनायक दळवी यांनी यावेळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच मंडळाच्या विधायक उपक्रमासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मंडळाचे सचिव महेश चव्हाण तर आभार मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर यांनी मानले. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर खुशखबर!*
*🎉मकर संक्रांती साठी खास ऑफर*
*(११जानेवारी ते ३१जानेवारी पर्यंत)*
*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*
*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*
_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_
_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_
_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._
*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*
• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप
*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.
❌सोमवार बंद.
*वेळ-सकाळी ९ ते रात्री ८*
*💁♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*
*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

