कुडाळ मध्ये भीषण अपघात ;दुचाकीस्वार जागीच ठार….
कुडाळ आर एस एन हॉटेल समोरील महामार्गावरील सर्कल येथे कार व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुचाकीच्या मागे बसलेला एकजण गंभीर जखमी झाला असून दोन्ही गाड्यांचे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर संतप्त झालेल्या कुडाळ वासीयांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले त्यामुळे महामार्गही ठप्प झाला होता.
मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या बाबत सविस्तर वृत्त असे की, पाट येथील दोघे युवक कुडाळ च्या दिशेने जाण्यासाठी आरएसएन हॉटेल समोरील महामार्गाच्या सर्कल वरून वळत होते. यावेळी गोव्यावरून येणाऱ्या कार ची जोरदार धडक त्यांच्या मोटारसायकलला बसली यामध्ये मोटरसायकल रस्त्याच्या विरुद्ध दिशेला फेकली गेली तसेच हे दोघे जण घटनास्थळीच रस्त्यावर आदळले. या मध्ये मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला.
येथील महामार्गावर मोठ्या प्रमाणात भीषण अपघात होत गेल्या काही महिन्यात अनेक जणांचे येथे अपघात होऊन आणि काही जण मृत्युमुखी पडले आहेत. याबाबत योग्य तो निर्णय महामार्ग प्रशासनाने घ्यावा अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. याचा राग येऊन प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या कुडाळ वासियांनी अपघातानंतर महामार्ग रोको आंदोलन केले त्यामुळे महामार्गावर महामार्ग ठप्प झाला महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अपघाताचे वृत्त समजताच कुडाळ दौऱ्यावर असलेले आमदार वैभव नाईक यांनी तसेच भाजपाचे कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे काका कुडाळकर तसेच इतर पक्षाचे पदाधिकारी दाखल झाले होते..
यावेळी संतप्त झालेल्या विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन ठप्प केला. त्यामुळे दोन्हीही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सदरचे आंदोलन चालू अचानक घडलेल्या या आंदोलनाची पूर्वकल्पना कुडाळ पोलिसांना नसल्यामुळे घटनास्थळी आंदोलन सुरू असताना पोलिसात दाखल झाले नाही. काही वेळाने पोलिस दाखल झाले.