कुडाळकोकणशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ट्रेकिंग रूट

ब्रिगेडियर सुधीर सावंत माजी खासदार

प्रतिनिधी सुनील आचरेकर

कसाल – माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येणार्‍या पर्यटकांसाठी विविध ठिकाणी ट्रेकिंग रूट निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे असे ब्रिगे सावंत म्हणाले. कसाल पावणाई मंदिर ते कसाल सडा ते ओवळीये सडा ते ओवळीये रामेश्वर मंदिर ते ओवाळीये शितगड ते शिरवंडे गणपती मंदिर ते किर्लोस कृषि विज्ञान केंद्र असा २५ किलोमीटरचा पाई प्रवास ब्रिगेडियर. सुधीर सावंत आणि छत्रपती शिवाजी महाराज ट्रेकिंग ग्रुप च्या कार्यकर्त्यांनी पार केला. कसाल पावणाई रवळनाथ मंदीर येथे जिल्ह्यातील या पहिल्या ट्रेकिंग रूट ला पावणाई रवळनाथ मंदिरात देवाला नमस्कार करून शुभारंभ करण्यात आला. या वेळी कसाल गावाचे वतीने कसाल सरपंच सौ संगिता परब यांनी ब्रिग्रेडियर सुधीर सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी कसाल गावच्या सरपंच सौ संगिता परब उपसरपंच दत्ताराम सावंत, यशवंत परब , कसाल तंटामुक्ती अध्यक्ष संतोष राणे, बाळा परब ,अवधूत मालणकऱ, बाळा कांदळकर, पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर, सत्यवान परब, ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत राणे, बाळा शिंगाडे, सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान किर्लोस चे उपाध्यक्ष तथा किर्लोस सरपंच, प्रदीप सावंत, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख भास्कर काजरेकर, डॉ. विलास सावंत अँड विवेक राणे उपस्थित होते. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करण्यास मोठ्या प्रमाणात वाव आहे. पर्यटक येण्यासाठी त्यांना सोई सुविधा महत्वाच्या असतात त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. ट्रेकिंग हे पर्यटकांना आकर्षित करण्याचा मार्ग आहे. आपला जिल्हा निसर्गाने नटलेला आहे. विविध झाडे – झुडपे, वनस्पती, पक्षी, प्राणी यांनी नटलेला आहे ते या पर्यटनाला महत्वाचे आहे, असे सुधिर सावंत म्हणाले. ट्रेकिंग रूट च्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील व त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. ओवाळीये सड्यावरती शिंगाडे व खरात घराण्यातील सदस्यांनी ट्रेकिंग प्रेमींचे उत्साहाने स्वागत केले. तिथे कातळ शिला पाहिली, तेथून पुढे ओवाळीये रामेश्वर मंदीर येथे ग्रामस्थांनी सर्वांचे स्वागत केले त्यावेळी दादा परब, सरपंच अंबाजी सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते. तेथून पुढे शितगड मार्गे शिरवंडे गणपती मंदीर मार्गे किर्लोस असे २५ की. मी. अंतर चालत पार केले. विविध औषधी वनस्पती, डोंगर दर्‍या, जंगल संपत्ती, निसर्ग न्याहळरत हा रूट पूर्ण केला. यामध्ये एकूण ६० ट्रेकिंग प्रेमींनी सहभाग घेतला. व यशस्वीरित्या अंतर पार केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!