भाजप ने फुक्याचे श्रेय घेऊ नये;एवढंच असेल तर स्वतःच्या वॉर्डात विकासकाम करून दाखवा -बाबू कुडतरकर
सावंतवाडी, दि.14:-शहरात होणाऱ्या ओपन जिम या आ. दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून होत आहे. या विकासकामासाठी शिवसेना नगरसेवक बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे भाजपला श्रेय घ्यायच असेल तर त्यांनी आपल्या प्रभागात विकासकामं करून घ्यावं, दुसऱ्याच्या वॉर्डमध्ये जाऊन श्रेय घेऊ नये असा टोला शिवसेना शहरप्रमुख, नगरसेवक खेम राज उर्फ बाबू कुडतरकर यांनी लगावला. तर विकासकामांसाठी पाठपुरावा कुणी केला ? निधी कुणी दिला ? हे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना ठाऊक असल्याच टिकास्त्र त्यांनी केल.

