बॅ.नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या ४४ विद्यार्थिनींची कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये निवड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.०८: मुंबई येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल ॲण्ड मेडीकल रिसर्च इन्स्टीटयूट मुंबई यांच्यातर्फे बॅ.नाथ पै नर्सिंग कॉलेज कुडाळ येथे कॅम्पस इंटरव्हू घेण्यात आला .त्यामध्ये कुडाळ येथील बॅ.नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या. ४४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित बॅ.नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग कुडाळ महाविद्यालयामध्ये अंतीम वर्ष बेसिक बी.एस्सी नर्सिंग व तृतीय वर्ष जी.एन.एम या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी बॅ.नाथ पै प्लेसमेंट सेल अंतर्गत कँम्पस इटरव्हूचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना करिअरच्या घडणीमध्ये विविध रोजगारसंधीचा लाभ मिळावा तसेच कोरोना महामारीच्या काळात बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्यावतीने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने प्रशिक्षीत नर्सेसना योग्य रोजगाराची संधी मिळावी या उददेशाने बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री.उमेश गाळवणकर, बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे मानद संचालक डॉ.अमेय देसाई, डॉ इशा पाटील व बॅ.नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या सौ.मीना जोशी यांच्या सहकार्यातून व कॅम्पस प्लेसमेंट सेल च्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पस इंटरव्हूमध्ये ४४ विद्यार्थ्यींनी व विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या कॅम्पस इंटरव्ह्यू कार्यक्रमाचे उद्घाटन कोकीलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल ॲण्ड मेडीकल रिसर्च इन्स्टीटयूट मुंबई यांच्या पथकातील सौ. हावोवी फौजदार (जनरल मॅनेजर नर्सिंग), सौ. स्नेहा करमळकर (गुणवत्ता आणि प्रशिक्षण नर्स शिक्षक), सौ. प्रज्ञा देवळेकर(वरिष्ठ अधिकारी एच.आर. विभाग) यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. या उदघाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. उमेश गाळवणकर, नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्या सौ.कल्पना भंडारी, नर्सिंग कॉलेजचे प्रा.ज्योती साकीन-तारी, प्रा.प्रणाली मयेकर, प्रा.सुमन करंगळे-सावंत, प्रा.शांभवी आजगावकर, प्रा.सौरभ खेडेकर, प्रा.अंकीता झगडे, प्रा.ऐश्वर्या सावंत उपस्थित होते.
बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या अंतीम वर्ष बेसिक बी.एस्सी अभ्यासक्रमाच्या २६ विद्यार्थीनींची व तृतीय वर्ष जी.एन.एम अभ्यासक्रमाच्या १८विद्यार्थीनींची या कॅँम्पस इटरव्हूमध्ये निवड करण्यात आली.
यशस्वी ठरलेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनींचे बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री उमेश गाळवणकर बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. मीना जोशी व उपप्राचार्या सौ कल्पना भंडारी यांनी अभिनंदन केले.
*🔥घरच्या जेवणासह नाश्त्याची चव आता सावंतवाडीत तीही खिशाला परवडणारी…🔥*
*_💥 आरोलकर खानावळ 💥_*
_शाकाहारी,मांसाहारी जेवण फक्त पार्सल सुविधा उपलब्ध…🛍️_
*🌈नाश्ता २० रुपये पासून!💰*
_घावणे चटणी,घावणे उसळ,शिरा,उपमा,पोहे,मिसळपाव,भजी,वडा,इडली,स्पेशल मेदूवडा,ब्रेड पकोडा…._
*🤷🏻♀️बुधवार,शुक्रवार,शनिवार,रविवार🤷🏻♂️*
😍 😝 _चिकन पाव_ 😝😍
*💂🏻♀️अस्सल मालवणी चुलीवरचे जेवण!*
_💫शाकाहारी जेवण ७० रुपये.._
_💫मांसाहारी जेवण ११० रुपये.._
_💫डबा घरपोच मिळेल.._
_💫पार्टी ऑर्डर्स स्विकारल्या जातील.._
_💫रोजच्या डब्याची ऑर्डर स्विकारली जाईल.._
*🔮संपर्क : महेश आरोलकर*
_तोरणे पाणंद, सबनिसवाडा,_
_सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग._
*_📱मोबाईल : 9867245572_*
*_7400237572_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_