इन्सुलीत लसीकरण उपक्रमास आज पासून प्रारंभ

बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
इन्सुली कोनवाडा येथील सांस्कृतिक हॉल मध्ये 45 वर्षा वरील वयोगटातील 100 जणांना लसीकरण करण्यात आले. इन्सुली येथे प्रथमच लसीकरण करण्यात आले असून त्याचे चोख नियोजन सरपंच तात्या वेंगुर्लेकर व सहकाऱ्यांनी केले होते. इन्सुलीचे प्रथम नागरिक तात्या वेंगुर्लेकर यांना लस देत लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी वॉर्ड क्रमाक एक मधील ग्रामस्थांना लस देण्यात आली.यानंतर अनुक्रमे 4 वॉर्ड क्रमांक पर्यंत लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच यांनी दिली.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, माजी सभापती मानसी धुरी, सरपंच तात्या वेंगुर्लेकर, उपसरपंच काका चराटकर, माजी सरपंच नम्रता खानोलकर,ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर, कृष्णा सावंत, दत्ता खडपकर, सोनाली मेस्त्री, वर्षा सावंत, वैद्यकीय अधिकारी जगदिश पाटील, अमित भाग्यवंत, रुपेश परब, सचिन पालव, सत्यवान गावडे आदी उपस्थित होते.
इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर यांनी इन्सुली गावात लसीकरण उपलब्ध करावे लागेल ती मदत ग्रामपंचायत प्रशासन करेल अशी मागणी आरोग्य विभागाकडे केली होती.सरपंच यांच्या मागणी प्रमाणे आरोग्यविभाकडून सोमवारी लसीकरण करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.दिवसभरात 100 जणांना लसीकरण करण्यात आले असून पुरवठ्यानुसार लसीकरण सुरूच राहणार असे सरपंच यांनी सांगितले.यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन केले होते.आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक प्रतिनिधी व स्वयंसेवक यांनी मदत केली.लस घेतलेल्या प्रत्येकाला दूध व बिस्कीट वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!