इन्सुलित विजेता लपंडाव सुरू- नागरिक हैराण
इन्सुलित विजेता लपंडाव सुरू- नागरिक हैराण
इन्सुली बिलेवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.त्यामुळे तेथील नागरीकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.गणेश चतुर्थीचा सण तोंडावर आला असल्याने आणि आपल्या बाप्पाला अंधारात ठेवावे लागण्याची भिती असल्याने बिलेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आक्रमण पवित्रा घेत बांदा महावितरणचे मुख्य अभियंता यांना यांना निवेदन देण्यात आले.यावेळी विजेचा लपंडाव बंद करा अन्यथा एकही ग्रामस्थ विज बिल भरणार नाही असे सांगण्यात आले.दोन दिवसांत विज वाहिन्या मोकळ्या करून पुरवठा सुरळीत करून देतो असा शब्द देत अभियंता यांनी निवेदन स्वीकारले यावेळी गजेंद्र कोठावळे,नंदु नाईक,फॅलिक्स फर्नांडिस,सचिन ठाकूर,विशाल कोठावळे,अमित सावंत,नंदकिशोर सावंत,सुर्यकांत सावंत,रोशन सावंत,संजय सावंत,शिवा गावडे,संतोष मांजरेकर,अमोल शिरोडकर आदी उपस्थित होते.

