तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरित द्यावी नुकसान भरपाई
आरोग्य व शिक्षण समिती सभापती डॉ.अनिषा दळवी
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-१७ :-* तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अंधारात गेला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भागात विजेच्या खांबांवर झाडं कोसल्यामुळे विद्युत पुरवठा व नेटवर्क सुविधा ठिकठिकाणी खंडित झाल्या आहेत.दोडामार्ग तालुक्यातही हीच स्थिती आहे.तालुक्यातील विद्युत पुरवठ्यावर मोठा परीणाम झाला आहे.संचारबंदीच्या काळात मोठ्या अडचणींना सामोर जात असलेल्या सर्वसामान्य जनतेला भयंकर नुकसान सोसावे लागले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्या प्रशासनाकडुन प्राप्त माहीतीनुसार तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात 447 घरांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे.तसंच 37 गोठ्यांचे नुकसान झालं आहे.143 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचे,10 शेडचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसान झालेल्या शेडमध्ये एका स्मशान शेडचाही समावेश आहे. त्याशिवाय 14 शासकीय इमारतीचे आणि 23 विद्युत पोल पडले असून 2 विद्युत वाहिन्यांचेही नुकसान झाले आहे.
ठिकठिकाणी मोबाईल नेटवर्क व विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने मिळवलेली माहीती स्तुत्य परंतु संदेह निर्माण करणारी आहे.दोडामार्ग तालुक्यात एका घराचं नुकसान झालं आहे तर 8 ठिकाणी झाडं पडली आहेत असे सांगण्यात येत आहे.मात्र प्रशासनाच्या ढोबळ मनाने न जाता सर्वसामान्य शेतकरी वर्ग व तालुक्यातील नुकसानग्रस्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे आणि शासनानेही या सर्वांची नुकसान भरपाई लवकरात लवकर देणे गरजेचे आहे,जेणेकरून आधीच लॉकडाउनचा मार सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या कुटुंबास थोडाफार हातभार लागेल.नुसत्या घोषणा न करता कृती करावी.लवकरात लवकर दोडामार्ग तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करताना प्रशासनाने हात आखडते घेउ नयेत अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी तसेच भारतीय जनता पार्टी दोडामार्ग यांनी केली आहे.