सिंधुदुर्ग | महासंग्रामाचा महानिकाल – थोड्याच वेळात सत्तेचं चित्र स्पष्ट!
सिंधुदुर्ग | महासंग्रामाचा महानिकाल – थोड्याच वेळात सत्तेचं चित्र स्पष्ट!
सिंधुदुर्ग –
जिल्ह्यातील राजकारण आज अक्षरशः श्वास रोखून पाहिलं जात आहे. जिल्हा परिषदच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० जागांचा निकाल आता काही क्षणांवर येऊन ठेपला आहे. कोण बाजी मारणार? कोणाची सत्ता हातातून निसटणार? याचं उत्तर लवकरच समोर येणार आहे.
ही केवळ निवडणूक नाही, तर प्रतिष्ठेची निर्णायक लढाई आहे.
पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि माजी आमदार वैभव नाईक – सगळ्यांचीच राजकीय पत आज मतमोजणीच्या टेबलवर लागलेली आहे. एका निकालाने समीकरणं बदलणार, तर दुसऱ्या निकालाने भविष्यातील राजकारणाची दिशा ठरणार आहे.
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची ‘अदृश्य धनशक्ती’ निर्णायक ठरणार का, हा प्रश्न सर्वांनाच छळतोय. शेवटच्या क्षणात गेम पलटवणारी जादू होणार की पक्षीय गणितंच वरचढ ठरणार, हेही थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय पावसी, कोलगाव, माटणे, आरोंदा आणि आंबोली या हाय-व्होल्टेज लढतींकडे. या मतदारसंघांचे निकालच सत्ता कुणाच्या हाती जाणार याचं चित्र ठरवणार आहेत.
आज सिंधुदुर्गात
— कोण जिंकणार?
— कोण हरणार?
— जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर अखेर सत्ता कुणाची?
थोड्याच वेळात या महासंग्रामाचा महानिकाल जाहीर होणार आहे… आणि त्यानंतर जिल्ह्याचं राजकारण कदाचित नव्याच वळणावर जाणार आहे.

