इन्सुली येथील ९२ वर्षीय आजोबांनी केली कोरोनावर मात;
कुटुंबीयांनी मानले जिल्हा रुग्णालयाचे आभार
आम्ही देव बघितला नाही पण देवाच्या रुपात डॉक्टर्स आणि नर्सना बघितले; पालव कुटुंबीयांचे उद्गगार
सावंतवाडी,दि.१७:-इन्सुली-डोबाशेळ येथील रहिवासी ९२ वर्षीय श्रीधर पालव यांनी कोरोनावर मात केली.आज दहा दिवसांनी ते जिल्हा रुग्णालयातुन बरे होऊन घरी पोचले.याचे सर्व श्रेय आपल्या वडिलांच्या इच्छाशक्ती बरोबरच डॉक्टर्स आणि नर्सना जातं असे त्यांचा मुलगा सुर्यकांत पालव आणि कुटुंबीयांनी सांगितले.डॉक्टर्स,नर्स आणि इतर कर्मचारी जी मेहनत घेतात त्याचे कौतुक करायला आज आमच्या जवळ शब्दच नाहीत असे पालव कुटुंबीय सांगतात, सर्व जिल्ह्यातील लोकांना आम्ही विनंतो करतो की,कोरोनाची जरा जरी लक्षणे दिसल्यास लगेच कोविड सेंटर गाठा आणि उपचार घ्या कोरोना बरा होतो.आज माझ्या वडिलांचे वय ९२ वर्षे असुनही ते कोरोनावर मात करून घरी परतले याचे श्रेय आम्ही डॉक्टर्स आणि नर्सना देतो,आपली आरोग्य यंत्रणा खुप चांगल्या प्रकारे काम करते, सकाळी आठ वाजता येणारे डॉक्टर्स रात्री दोन-दोन वाजेपर्यंत काम करतात,हे डॉक्टर्स नसुन आम्हाला ते देवदुत वाटतात आम्ही देव बघितला नाही पण गेले १० दिवस आम्ही ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात देवाच्या रुपात डॉक्टर्स आणि नर्सना बघितले असे सुर्या पालव यांनी उद्गगार काढले