जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, ही दुकाने राहतील पुर्णवेळ उघडी…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴सिंधुदुर्ग : दि. १६ जिल्ह्यात चक्रीवादळाने थैमान घातले आहे. या चक्रीवादळामध्ये जिल्ह्यात घरे, गोठे आणि अनेक इमारतींची छप्पर उडुन जात मोठी पडझड होवुन नुकसान झाले आहे.
त्यामुळे या वादळाचा प्रभाव कमी झाल्यावर या सर्व इमारती, घरे, गोठे आदींची दुरुस्ती करण्याकरिता जिल्ह्यातील ज्या दुकानांमध्ये ताडपत्री, प्लास्टिक कागद, खिळे, कुऱ्हाड, बांबु, तसेच दुरुस्तीसाठी लागणारे सर्वच आवश्यक साहित्य असणारी दुकाने आजपासुन २० मेपर्यंत पुर्णवेळ उघडी ठेवण्यास सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.
याबाबतचे अधिकृत आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.

