दोडामार्गात शिवसेना वर्धापन दिन साजरा : दोडामार्ग कोविड सेंटर व पोलीस तपासणी नाक्यावर अल्पोपहार तर रुग्णालयात फळे वाटप
शिवसेना दोडामार्ग च्या वतीने आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली कोविड सेंटर दोडामार्ग तर तालुका संघटक संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली पोलिस चेक नाका दोडामार्ग आदी ठिकाणी अल्पोपहार वाटप करण्यात आला. यावेळी शिवसेना स्थापनेचा मूळ उद्देश व सेनेच्या इतिहासाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला, तसेच रुग्णालयात रुग्णांना फळे वाटपही करण्यात आले.
यावेळी बाबुराव धुरी,तालुकाप्रमुख शिवसेना , डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे, डोंगरी विकास कमिटी जिल्हा सदस्य तथा तालुका संघटक संजय गवस, माजी शहरप्रमुख चंदन गावंकर, विजय जाधव व लक्ष्मण आयनोडकर, मिलिंद नाईक, अजित गवस, देवानंद शेटये, गुरू सावंत उपस्थित होते.

