नगरपरिषदेचा कंत्राटी कामगार रामा धर्मेंद्र पाटील यांचे निधन

सावंतवाडी, दि २ सावंतवाडी नगरपरिषदेचा कंत्राटी कामगार रामा धर्मेंद्र पाटील वय ३० रा. जिमखाना याचे आज गडहिंग्लज येथे उपचारादरम्यान निधन झाले. तो गेले काही वर्षे आजारी होता. त्याला काविळ झाली होती. त्याच्यावर उपचार सुरू होते. आज त्याची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्यामुळे त्याला शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तेथे दाखल करण्यास त्याला नकार देण्यात आला. त्यामुळे अधिक उपचारासाठी त्याला गडहिंग्लज येथे नेण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याबाबतची माहिती मिळताच लाखे वस्तीवर

शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!