◾वैभववाडी तालुक्यात आज १५ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह ; आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार यांची माहिती..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि-२१ :- तालुक्यात आज आणखी १५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तालुक्याची एकूण रुग्ण संख्या ६२२ वर गेली आहे. सद्यस्थितीत २२६ रुग्ण सक्रिय आहेत.
तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गेल्या चोवीस तासात तालुक्यात १५ जणांचे रिपोर्ट पाॅॅझीटिव्ह आले आहेत. यामध्ये सोनाळी ७, एडगाव १, वैभववाडी २, सांगुळवाडी १, मांगवली -१, तिरवडे तर्फ सौंदळ २, नाधवडे १ अशा रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात सध्या ११ कंटेनमेंट झोन सक्रिय आहेत.
एकुण रुग्ण संख्येपैकी गृहविलगीकरणात १७१, संस्थात्मक विलगीकरणात ४७, ओरोस जिल्हा रुग्णालयात-४, जिल्ह्याबाहेर ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिल पवार यांनी दिली.

