जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर
डॉ. चव्हाण यांच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी केला युक्तिवाद
जिल्हा न्या. आर. बी. रोटे यांनी केला ६ मार्चपर्यत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांना अखेर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला. जिल्हा सत्र न्यायाधीश २ आर. बी. रोटे यांनी हा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. डॉ. चव्हाण यांच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. डॉ. चव्हाण यांच्याविरोधात जिल्हा रुग्णालयातील एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने लैंगिक शोषणाची तक्रार दिली होती. त्यानुसार डॉ. चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत जिल्हा न्यायालयात डॉक्टर चव्हाण यांच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती आर. बी. रोटे यांना ६ मार्चपर्यंत डॉ. चव्हाण यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.