◼️ दोन मुलांनंतर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेणा-या दहा समाधानी लाभार्थी दांपत्याचा सत्कार
◼️ आरोग्य केंद्र व रुग्ण कल्याण समिती तर्फे करण्यात आला सत्कार
*🖥️Kokan Live Braking News
✍️प्रतिनिधी:शैलेश गवस
🎴बांदा, दि,२६:- दोन मुलांनंतर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या १० समाधानी लाभार्थी दाम्पत्यांचा बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्ण कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला.
दोन मुलांनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी शासनाकडून जनजागृती करण्यात येते. मात्र बहुतांश पालक या योजनेकडे पाठ फिरवितात. तर काही पालक स्वतःहुन पुढाकार घेत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतात. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या बांदा-सटमटवाडी, इन्सुली, जमसंडे (सध्या रा. बांदा), निगुडे-जाधववाडी, इन्सुली-परबवाडी, सावंतवाडी, रोणापाल, कसाल आदी ठिकाणच्या पालकांचा आरोग्य केंद्राच्या सभागृहात सत्कार करण्यात आला.
यावेळी रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षा उन्नती धुरी, सहअध्यक्षा श्वेता कोरगावकर, सभापती मानसी धुरी, उपसभापती शीतल राऊळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन, डॉ. तुषार भाग्यवंत, ग्रामपंचायत सदस्य अंकिता देसाई, लक्ष्मी सावंत, श्याम सावंत, आरोग्य सहाय्यक श्री. आंबेरकर, श्री. वेटे, श्री. म्हापणकर आदी उपस्थित होते.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे समाधानी लाभार्थी दाम्पत्यांचा सत्कार करताना उन्नती धुरी, श्वेता कोरगावकर.