कणकवलीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कणकवलीत आरओडब्ल्यू लाईनमधील बहुतांशी बांधकामे तुटण्याची शक्यता..

▪️महामार्ग प्राधिकरणच्या उपअभियंत्यांची पोलीस बंदोबस्ताची मागणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१३: शहरात महामार्गाचे काम अखेरच्या टप्प्यात आले, असतानाच महामार्ग प्राधिकरणकडून आरओडब्ल्यू लाईनच्या आत येत असलेली बांधकामे काढण्याबाबत हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यामुळे येत्या १५ फेब्रुवारीपासून कणकवली शहरात आरओडब्ल्यू लाईनमध्ये येत असलेली बहुतांशी बांधकामे तुटण्याची टांगती तलवार या बांधकाम मालकांवर असणार आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरणच्या उपअभियंत्यांनी पोलीस अधीक्षकांना पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे.

आरओडब्ल्यू लाईनमध्ये येणारी बांधकामे काढताना कणकवली शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्याने १५ ते १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस बंदोबस्ताची मागणी महामार्ग प्राधिकरणकडून करण्यात आली आहे.

कणकवली शहरात अनेक ठिकाणी चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत असतानाच शहरात काही भागांमध्ये नळ योजनेच्या पाईपलाईन व विद्युत केबलचे काम अद्याप बाकी आहे. त्यामुळे ही व इतर कामे मार्गी लागण्यासाठी महामार्ग प्राधिकरणकडून पोलीस बंदोबस्ताची जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आरओडब्ल्यू लाईनमध्ये येणारी व नव्याने झालेली कणकवली शहरातील काही बांधकामे महामार्ग प्राधिकरणच्या रडारवर आली आहेत. त्यामुळे कणकवलीत येत्या काळात यावरून काय रणकंदन माजणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आरओडब्ल्यू लाईनमधील बांधकामे हटवा, आरओडब्ल्यू लाईन निश्चित करा अशी आग्रही मागणी ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणकडे केली होती. तत्पूर्वी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनीदेखील शहरातील आरओडब्ल्यू लाईन क्लिअर करण्याची मागणी केली होती. तसेच नगरसेवक कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर यांनी शहरातील हायवेच्या अनेक समस्यांबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता.

काही दिवसांपासून शहरातील आरओडब्ल्यू लाईन निश्चित करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, आरओडब्ल्यू लाईनची हद्द निश्चित करणारे निस काही भागात लावण्यात आले आहेत. आता महामार्ग प्राधिकरणकडून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आल्याने, यापुढे कणकवलीत आरओडब्ल्यू लाईनमध्ये येणारे बांधकामधारक काय भूमिका घेतात व कणकवली शहराच्या राजकीय नेते पदाधिकाऱ्यांकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!