सिंधुदुर्गात भाजप-शिवसेना राजकीय वातावरण तापले; पोलीस प्रशासन सज्ज
▪️अनुचित प्रकार घडु नये यासाठी दंगल नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या कणकवलीत तैनात..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१३: गेले काही दिवस माजी खासदार निलेश राणे व खासदार विनायक राऊत यांच्यातील राजकीय वाद आता टोकाला गेला आहे. एकमेकांवर टोकाचे आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या समर्थनार्थ विनायक राऊत यांचा पुतळा जाळण्यापासुन ते अनेक इशारे दिल्याने जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. त्यातच शिवसेनेकडुनही राणे यांना प्रत्युत्तरादाखल निर्वाणीचा इशारा देण्यात आल्यामुळे, जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडु नये. या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. दोन्ही बाजुने एकमेकांना फटके घालण्याची भाषा झाल्याने, पोलिसांनी सतर्क राहण्याची भुमिका घेतली आहे. त्यादृष्टीनेच कणकवलीत दंगल नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या कणकवली पटवर्धन चौकात तैनात ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात हा वाद काय वळण घेणार याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागुन राहिले आहे.
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_