नरडवे महंमदवाडी धरणाच्या रनिंग बिलात तब्बल ४० कोटींचा भ्रष्टाचार; मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा आरोप
▪️भविष्यात नरडवेसह कणकवली तालुक्यातील गावांना धरणफुटीचा धोका..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.११: नरडवे महंमदवाडी धरणाच्या रनिंग बिल ६२ या एकाच बिलामध्ये तब्बल ४० कोटींचा भ्रष्टाचार धरण ठेकेदार आणि पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यांनी संगनमताने केला असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे. धरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून भविष्यात धरणफुटीचा धोका नरडवेसह कणकवली तालुक्यातील गावांना असल्याचा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर म्हणाले.
चक्रधर कन्स्ट्रक्शन जळगाव ही कंपनी २०१९ पासून धरणाचे काम करत आहे. मार्च २०२० पर्यंत केवळ ३१ दिवस काम करून ६७ कोटींचे पेमेंट ठेकेदार चक्रधर कंस्ट्रक्शन ला कार्यकारी अभियंत्यांनी दिलेया आहे.कोव्हीड काळात निधी आरोग्य विभागाकडे वळवला असतानाही पाटबंधारे च्या अभियंत्यांनी २३ मार्च रोजी ६७ कोटींचे पेमेंट एकाच दिवशी देण्यात आले आहे. यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उपरकर यांनी केला. सुरुवातीचे टेंडर सी १ दर्जाचे होते. २००५ साली ६.६ मीटर उंची वाढवल्याने बी १ सूची दराने टेंडर निघाले. त्यामुळे रनिंग बिल ६२ मध्ये रेकॉर्डिंग करताना सी १ पद्धतीने बिल केले मात्र पेमेंट बी १ पद्धतीने केले. गौण खनिज वसुली करताना सी १ पद्धतीने रेकॉरिंग केले मात्र बिल अदा कर्तवन बी १ पद्धतीने केले आहे. एमबी मधील पेज नं आणि चॅनेज नं मध्ये तफावत आहे. प्रत्यक्ष हारटिंग आणि केंसिंग चे ३ लाख ४२ हजार ८०० क्यूबिक मीटर चे काम झाल्याचे दिसत आहे. मात्र बिलात रेकॉर्ड करताना १३ लाख ९२ हजार ९१६ चे हारटिंग आणि केंसिंग चे बिल बी १ पद्धतीने केले आहे. एकूण १० लाख ५ हजार ११६ क्यूबिक मीटर ची लांबी जास्त दाखवली गेली आहे. काहिठिकानी पिचिंग वर्क केले नाही.पिचिंग केल्याठिकानी ४ इंच वाळू कोरस फिल्टर ८ इंच दगड आणि पिचिंग स्टोन १ फूट ६ इंच हा डाऊन स्टीम बाजूने आणि अपस्टीम ला ३० एमएम चा दगड असणे आवश्यक आहे. खडी वाळू रॉयल्टी वसुली केलेली नाही. २० कोटी ३२ लाख २६ हजार ६६६ रुपयांची रॉयल्टी प्रत्यक्ष भरणे आवश्यक असताना ४ कोटी ९६ लाख ६३ हजार ०६९ रुपये रॉयल्टीपोटी ठेकेदाराकडून भरून घेतले आणि ठेकेदाराच्या घशात १५ कोटी ३५ लाख ६३ हजार ५९७ रुपये पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने घातल्याचा आरोप उपरकर यांनी केला. रनिंग बिल ६२ मध्ये ४० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही उपरकर यांनी केला. याबाबत प्रधान सचिव जलसंपदा, प्रधान सचिव पाटबंधारे, प्रधान सचिव वित्त, मुख्य अभियंता तसेच केंद्र सरकारच्या संबंधित योजनेच्या चीफ एक्झिक्युटिव्ह तसेच पीएमओ ऑफिसला तक्रार केली असून, सीबीआय तसेच ईडी ला भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी तक्रार अर्ज दिल्याची माहिती उपरकर यांनी दिली.
*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*
*🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*
_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._
*🤷🏻♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_