सिंधुदुर्गातील इकोसेन्सीटिव्ह झोन मधील दगड खाणीबाबतीत मनसेचे प्रदेश सरचिटणीस उपरकर यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.२४: जिल्ह्यात सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील इकोसेन्सीटिव्ह झोन मधील दगडखाणी बाबतीत मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांना निवेदन देत लक्ष वेधले.

निवेदनात असे म्हटले आहे की, सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये, सोनुर्ली, इन्सुली या गावांमध्ये काळ्या दगडाच्या खाणी व क्रशर आणि हॉटमिक्स प्लँट बसविण्याची परवानगी व उत्खननाची परवानगी आपल्याकडून देण्यात आलेली आहे. सदर परवानगी सोनुर्ली गावात सुमारे १६ वेत्ये गावात ८ काळ्या दगडाच्या खाणींना परवानगी देण्यात आलेली आहे. विनापरवाना उत्खनन वरील गावातील मोठया क्रेशर व हॉटमिक्स प्लँटही बसवलेले आहेत, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

सदर गावामधुन या खाणीबाबत ग्रामपंचायतींनी व ग्रामस्थांनी होणारे जास्त स्फोट व आणि हादरे बसुन घराला जाणारे तडे गेलेले आहेत आणि प्रदुषण होत असल्याबाबत जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रारी करुन त्या तक्रारीवरुन जिल्हाधिकारी व खनिकर्म विभागांनी वेत्ये, इन्सुली, निगुडे या गावातील पर्यावरणाबाबत प्रदुषण महामंडळाला पत्र लिहीलेले आहे. त्याचप्रमाणे दोडामार्ग तालुक्यातील परमे ता. दोडामार्ग, सोनुर्ली, वेत्ये  याबाबत संचालक मायनिंगसेप्टी गोवा येथेही पत्रव्यवहार केलेला आहे, असे उपरकर यांनी सांगितले.

या क्रेशर आणि काॅरीमुळे होत असलेल्या त्रासांबाबत ग्रामस्थांनी सदर खाणीची व पाटबंधारे प्रकल्प यांनी क्रेशर बंदची मागणी केलेली होती व तडे गेलेल्या घरांचे मुल्यांकन करुन त्यांना कोणत्याही प्रकारची भरपाई देण्यात आलेली नाही, असे ते म्हणाले.

सावंतवाडी तालुक्यातील सरंबळे या धरणाच्या लाभ क्षेत्रात वरील गावे येत आहेत. वेत्ये व सोनुर्ली, इन्सुली या गावातुन जाणाऱ्या तिलारी पाटबंधारे कालव्यालगत काही अंतरावरती क्रेशर बसविण्यात आलेल्या आहेत. परमे हे दोडामार्ग तालुक्यातील इकोसेन्सीटीव्ह भागामध्ये येत अशी माहिती माझ्याकडे त्या ग्रामस्थांनी तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे इकोसेन्सीटीव्हमध्ये सरंबळ धरणाचा लाभ क्षेत्रातील गावामध्ये क्रेशर व काळ्या खाणीचे दगड उत्खननाकरीता परवानगी देणे योग्य नाही. त्यामुळे या क्रेशर व काळ्या दगडाच्या खाणी रद्द करण्यासाठी व त्यांचा परवाना नुतनीकरण किंवा उत्खननाची रॉयल्टी भरुन घेऊनच नवे परवानगी रद्द करण्यात यावी. अशा प्रकारची मागणी केली आहे असे त्यांनी सांगितले.

या गावामध्ये परवानगी घेतलेल्या खाणींपेक्षा विनापरवाना खाणी मोठया प्रमाणात आहेत. त्याचबरोबर एक सर्व्हे नंबरची परवानगी घेऊन दुसऱ्या सर्व्हे नंबर उत्खनन करत असल्याची माहिती कळत आहे. त्यामुळे या सर्व खाणींच्या चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

सदर काही खाणींमध्ये आपणाकडुन देण्यात आलेल्या परवानगीपेक्षा ९० फुटाच्या खाली उत्खनन केले असल्याने ग्रामस्थांच्या तक्रारीवरुन मे.दिलीप बिल्डकोन यांच्या खाणीवर स्वतः तहसिलदार जावुन ९० फुटापेक्षा खोल उत्खनन झाल्याचा अहवाल सादर केलेला आहे. हे आपल्या परवागीचे उत्खनन आणि पर्यावरणाच्या नियमाचे उल्लंघन होत आहे, याकडे लक्ष वेधले आहे.

तसेच परवानगी पेक्षा जास्त खोल म्हणजेच २० फुटापेक्षा जास्त खोलीचे होल मारुन स्फोट केल्याने आजुबाजुच्या घरांना तडे जाऊन भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत ही कमी होऊन काही ठिकाणचे पाण्याचे प्रवाह बदलण्याने काही गावांमध्ये पाणीटंचाई, विहिरीचे पाणी कमी होऊ लागले आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी साठ्याचे नियमाचे उल्लंघन (अंडरग्राऊंड वॉटरअॅक्ट) हा ही पर्यावरणाचा भाग आहे. त्याचप्रमाणे एका गावात किती क्रशर असावेत अशा मोठया प्रमाणात क्रेशर असल्यामुळे त्या-त्या गावाच्या भुपुष्ठाच्या बेरिंग कॅपेसिटीचा विचार केला गेलेला नाही व लाभ क्षेत्रात व इकोसेन्सीटीव्ह भागामध्ये वनजमिनीलगत काही ठिकाणी काळया दगडाच्या खाणींचा परवानगी दिली गेल्याने वनपर्यावरण प्रदुषण यांच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याबाबत योग्य ती चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी उपरकर यांनी केली आहे.

या दिलेल्या क्रशरच्या परवानगीबाबत वनपर्यावरणाच्या उल्लंघन होत असल्याने हरिलवादाकडे, न्यायालयाकडे दाद मागावी लागेल याची नोंद घ्यावी, असे मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी  यांना निवेदन देताना माजी आमदार परशुराम उपरकर, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री,
कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किणळेकर, सचिव बाळा पावसकर, आपा मांजरेकर आदी उपस्थित होते.

*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*

आता *ऑनलाईन🌎*   पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃

   *📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*

_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_  *BAJAJ FINANCE⚡* _आणि_  *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_  *0%💫* _व्याजदरासह…!_🤩

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर  फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे  LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier   ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*

*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी

*📲संपर्क : 7719918722*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!