जाणवलीचा अपघात ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामामुळे..
▪️अपघात झाले नाहीत म्हणाऱ्या खासदार विनायक राऊत आता याला जबाबदार कोण ते सांगा..
▪️मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांचा प्रश्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०९: मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढलेली आहे. या अपघातांची नोंद होत नसल्यामुळे या महामार्गावरील धोक्याची तीव्रता जाणवत नाही आहे. आज जाणवली येथे झालेला अपघात हा ठेकेदाराचे नियोजनशून्य काम आणि निकृष्ट कामामुळे झालेला आहे. तर एकही अपघात झाला नाही असं म्हणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी या अपघाताला जबाबदार कोण ते सांगावे. उगाच ठेकेदाराला पाठीशी घालणे सोडावे असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना उपरकर म्हणाले. खासदार विनायक राऊत याना हा मार्ग लोकार्पण करण्याची घाई झाली आहे. मात्र या मार्गावर होणाऱ्या अपघातांकडे त्यांचे लक्ष नाही. आज जाणवली येथे अपघात होऊन ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयानक होता कि दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सातत्याने या मार्गावर अपघात होत असून, काही अपघातांची नोंद होते तर काहींची होत नाही. असेही उपरकर यांनी यावेळी सांगितले.
कणकवलीतच या महामार्गाच्या फ्लायओव्हर ब्रिजचा कणकवली पंचायत समितीजवळ शिवाजी पुतळ्याकडे स्लॅब कोसळला होता. त्या आधी कणकवली एसएम हायस्कुल समोर महामार्गाच्या भिंतीला तडे गेलेत. तर ६ ते ७ ठिकाणी भिंत कोसळली. यावेळी सत्ताधारी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी हि भिंत काढून टाकली जाणार असल्याचे सांगितले. अद्यापही याबाबतीत कोणतीही कारवाई झालेली नसताना खासदार राऊत याना लोकार्पणाची एवढी घाई का? असा प्रश्नही परशुराम उपरकर यांनी विचारला आहे.
दुसरं अपघाताच्या बाबतीत सेफ्टी एजन्सी काहीच पाहत नाही. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या काळात या मार्गावर वाहतूकच नव्हती. जी काही होती ती अत्यंत तुरळक होती. त्यामुळे अशावेळी अपघात होणार कसे. हे आधी खासदार विनायक राऊत यांनी लक्षात घेतले पाहिजे. आणि नंतरच या मार्गावर अपघात झाले नाहीत किंवा होत नाहीत असे वक्तव्य करावे असा सल्लाही माजी आमदार उपरकर यांनी यावेळी दिला आहे.
दरम्यान आम्ही या मार्गाच्या विविध प्रश्नांबाबत आधीच मुंबई उच्च न्यायालयात गेलो आहोत. आता या मार्गावर होणारे अपघात आणि मार्गाचे नियोजन शून्य काम. मार्गाचे काम अपूर्ण असताना सत्ताधाऱ्यांना त्याचे लोकार्पण करण्याची झालेली घाई या बाबीही आम्ही आता न्यायालयाच्या लक्षात आणून देणार आहोत असेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_