चिपळूण शहर राष्ट्रवादी युवक तर्फे कौशल्य विकास, इंग्लिश स्पिकिंग, मुलाखत तंत्र मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.१०: शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव अक्षय केदारी यांनी आमदार शेखर निकम व शहराध्यक्ष मिलिंद कापडी यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास , इंग्रजी स्पिकिंग व इंटरव्यू टेक्निक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कोर्ससाठी लागणाऱ्या फीमधला ६० टक्के फीचा भार उचलून, जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांना नामवंत शैक्षणिक संस्थेतून व्यक्तिमत्त्व विकास, इंग्लिश स्पिकिंग कोर्स देण्याचा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रयत्न आहे. तसेच विद्यार्थ्यांना नोकरीसाठी लागणाऱ्या मुलखात तंत्र मार्गदर्शनाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. अनिरुद्ध शेखर निकम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आला. कोर्स पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवस दिनी प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे. शहरातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी पंचायत समिती सदस्य पांडुरंग माळी, अनिरुद्ध शेखर निकम, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर सरचिटणीस मनोज जाधव, सचिन पाटेकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर, चिपळूण शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धेश लाड, सचिव अक्षय केदारी, सोशल मीडियाचे सचिन साडविलकर, राज कदम व ऋतुज डाकवे आदी उपस्थित होते.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

