करियरमनोरंजनसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

फुकेरी भजन स्पर्धेत मणेरीचा स्वराभिषेक संघ प्रथम..

▪️गितेश कांबळी उत्कृष्ट गायक..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा,दि.१०: फुकेरी येथील श्री देवी माऊली कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत मणेरीच्या स्वराभिषेक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. मातोंडचा श्री देव इसवटी भजन मंडळ द्वितीय तर सांगेलीच्या सनामदेव भजन मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. माजी जि. प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी व भाजपा जिल्हा सरचिटणीस सुधीर दळवी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

फुकेरी येथील माऊली मंदिरात श्री देवी माऊली कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचे उद्घाटन भाजपा जिल्हा सरचिटणीस सुधीर दळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी सरपंच सावित्री नाईक, परीक्षक शेख गुरुजी, श्री. गोसावी, केंद्रप्रमुख संदिप गवस, रघुनाथ आईर, अध्यक्ष अमित गवस, मानकरी दिनेश आईर, सुभाष आईर, अनंत आईर, आनंद आईर, गणू आईर, ज्ञानेश्वर आईर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – प्रथम स्वराभिषेक भजन मंडळ मणेरी, द्वितीय श्री देव इसवटी भजन मंडळ मातोंड, तृतीय श्री सनामदेव भजन मंडळ सांगेली. उत्कृष्ट तबलावादक – देवेंद्र च्यारी (माऊली भजन मंडळ कोलझर), उत्कृष्ट गायक गितेश कांबळी (मणेरी), उत्कृष्ट हार्मोनियम वादक गुरुनाथ झोळंबेकर (श्री दत्त विठू माऊली भजन मंडळ झोळंबे).

स्पर्धेतील सर्व विजेत्यांना जि. प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, सुधीर दळवी, केंद्रप्रमुख संदिप गवस, अध्यक्ष अमित गवस, परीक्षक शेख गुरुजी, श्री. गोसावी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सुधीर दळवी, रामचंद्र आईर, बाळकृष्ण आईर, राकेश नाईक, रामप्रसाद आईर, सावंतवाडी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर व अर्जुन गवस यांनी पारितोषिके पुरस्कृत केली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित गवस, सुत्रसंचलन निलेश आईर व आभार सुनील आईर यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!